शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

जिग्नेश ठक्कर हत्या प्रकरणात आणखी एक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 4:18 AM

एकूण अटक आरोपींची संख्या चार

कल्याण : रेल्वे स्थानकाजवळील नीलम गेस्टहाउसच्या गल्लीत गुन्हेगार जिग्नेश ठक्कर याची गोळ्या घालून हत्या केल्याप्रकरणी शार्पशूटरला नुकतीच ठाणे खंडणीविरोधी पथकाने गुजरात येथून अटक केली होती. त्यानंतर, दोन जणांना शुक्रवारी, तर शनिवारी चेतन पटेल याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण अटक आरोपींची संख्या चार झाली आहे.२९ जुलैला चेतन पटेल याच्यासोबत जिग्नेशचे भांडण झाले होते. या प्रकरणी चेतनने जिग्नेश याच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. जिग्नेश यानेही पटेलविरोधात तक्रार दिली होती. त्यामुळे दोघांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे त्याचा राग नन्नू शहा याला आला होता.नन्नू व जिग्नेश हे बालपणापासून मित्र होते. एका खंडणीप्रकरणी जिग्नेश व नन्नू शहा हे सहआरोपी होते. नन्नू शहाच्या विरोधात १५ ते २० गुन्हे दाखल आहेत. त्यात खंडणी, हत्येचा प्रयत्न, हत्या यांसारखे गुन्हे आहेत. तर, जिग्नेशच्या विरोधातही गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल झाले होते.दरम्यान, जिग्नेशच्या हत्येप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने गुजरात येथून जयपान याला अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी अमजद पठाण व मुन्ना शहाला अटक केली आहे. या तिघांच्या अटकेनंतर शनिवारी चेतन याला अटक करण्यात आली आहे.मात्र, प्रमुख आरोपी नन्नू शहा याला अद्याप अटक झालेली नाही. पोलीस त्याच्या शोधात आहेत.