शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या व्यावसायिकाचे एक लाख रुपये ठाण्यातील हॉटेलमधून लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 20:33 IST

व्यावसायिक कामानिमित्त ठाण्यात आलेल्या जळगावच्या एका बांधकाम व्यावसायिकाचे एक लाख रुपये ठाण्यातील एका हॉटेलमधून चोरी झाले.

ठळक मुद्देहॉटेलच्या रुममध्ये ठेवली होती पैशाची बॅगवागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : ठाण्यातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबलेल्या जळगाव येथील एका बांधकाम व्यावसायिकाचे एक लाख रुपये गुरुवारी रात्री हॉटेलमधून चोरी झाले.जळगाव येथील काव्य रत्नावली चौकाजवळ राहणारे अक्षय श्रीराम खटोड यांनी शैक्षणिक साहित्याच्या उत्पादनासाठी भिवंडी येथील काल्हेर येथे उभारलेल्या राजलक्ष्मी इंडस्ट्रिजचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी होता. त्यासाठी गुरूवारी सकाळी ते ठाण्यात आले. आरटीओ आॅफिसजवळच्या हॉटेल शरनममधील रूम क्रमांक ४0२ मध्ये ते मुक्कामी थांबले होते. गुरूवारी दुपारी १२ वाजता ते कंपनीच्या कामासाठी काल्हेर येथे गेले. एक लाखाची हॅण्डबॅग त्यांनी रूममध्येच ठेवली होती. रात्री ९.३0 वाजता ते हॉटेलमध्ये परत आले. शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास बॅगमधील सामान नीटनेटके भरून ठेवत असताना हॅण्डबॅगमधील एक लाख रुपये गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. खटोड यांनी याप्रकरणी शुक्रवारी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी प्रथमदर्शनी हॉटेलमधील कर्मचाºयांवर संशय येत असला तरी, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी आणि सखोल चौकशी केल्याशिवाय काही सांगणे कठिण असल्याचे तपास अधिकारी अनिकेत पोटे यांनी सांगितले.अक्षय खटोड यांनी गुरूवारी दुपारी हॉटेलच्या रूममधून बाहेर पडण्यापूर्वी त्यांचे रात्री घालण्याचे कपडे बॅगवर ठेवले होते. रात्री ते रूमवर परतले तेव्हा त्यांचे कपडे बॅगवर नव्हे तर टेबलवर होते. हा फरक त्यांच्या लक्षात आला होता. मात्र हा बदल त्यांनी गांभीर्याने घेतला नाही. खटोड यांच्या अनुपस्थितीत रुममध्ये साफसफाईसाठी आलेल्या हॉटेलच्या कर्मचार्‍याने चोरी केली की आणखी कुणी, हे तपासानंतरच स्पष्ट होऊ शकेल.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस