ट्रक-लक्झरीच्या भीषण अपघातात १ ठार, १२ जखमी; मुंबई-अहमदाबाद मार्गावर अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 04:45 IST2020-01-15T04:45:28+5:302020-01-15T04:45:36+5:30
जखमींना मनोर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच नागझरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रक-लक्झरीच्या भीषण अपघातात १ ठार, १२ जखमी; मुंबई-अहमदाबाद मार्गावर अपघात
मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार फाटा येथे गुजरात दिशेने जाणाऱ्या बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघात मंगळवारी एक ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमधील अन्य १२ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चिल्हार फाट्याजवळ लक्झरी बसवर ट्रक आदळल्याने बस उलटली. ट्रक गुजरातकडून मुंबईकडे जाताना रस्त्यातील डिव्हायडर तोडून मुंबईकडून गुजरातकडे जाणाºया लक्झरी बसवर धडकला. बसमध्ये असलेल्या प्रवाशांपैकी एक जण गाडीखाली दबून मृत्यू पावला.
बसच्या मालकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले, मात्र त्याचे नाव तसेच जखमी प्रवाशांची नावे समजली नाहीत. जखमींना मनोर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच नागझरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना आम्ही उपचारासाठी रु ग्णालयात पाठवले आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक कोळी यांनी दिली.