क्रिकेट खेळताना एकाचा मृत्यू 

By धीरज परब | Updated: June 3, 2024 13:33 IST2024-06-03T13:32:53+5:302024-06-03T13:33:25+5:30

कंपनीचे तरुण एकामेकांविरोधात क्रिकेट खेळत होते.

one dies while playing cricket  | क्रिकेट खेळताना एकाचा मृत्यू 

क्रिकेट खेळताना एकाचा मृत्यू 

मिरारोड: येथे क्रिकेट खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  काशिगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खाजगी जागेत कंपनीतर्फे क्रिकेट मॅच आयोजित करण्यात आल्या होत्या. बॉक्स क्रिकेट खेळत असताना कंपनीचे तरुण एकामेकांविरोधात क्रिकेट खेळत होते.

त्यावेळी हा तरुण  फलंदाजी करत होता.क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका आला व  त्याचा मृत्यू झाला. क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या एका 4२ वर्षीय तरुणाचा खेळताना हृदयविकाराने दुपारी १२ च्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत काशिगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून तपास करत आहेत. मयत रामगणेश कृष्णन तेवर (42)हा एका बिल्डर कडे कामाला असून त्या बिल्डर मार्फत कर्मचाऱ्या करता  क्रिकेट स्पर्धा काशिगांव येथील खाजगी जागेत  रविवारी  आयोजित करण्यात आल्या होत्या.

Web Title: one dies while playing cricket