भिवंडीत पाण्याच्या वादातून दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू

By नितीन पंडित | Updated: November 3, 2022 19:26 IST2022-11-03T19:26:14+5:302022-11-03T19:26:22+5:30

तुषार सिंग असे गुन्हा दाखल झालेल्या शेजाऱ्याचे नाव आहे. तर सादीक कासिम अन्सारी (२६) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

One dies after falling from second floor due to water dispute in Bhiwandi | भिवंडीत पाण्याच्या वादातून दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू

भिवंडीत पाण्याच्या वादातून दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू

भिवंडी: पिण्याच्या पाण्यावरून शेजारी राहणाऱ्या तरुणांशी झालेल्या वादात दुसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन दोघेही इमारतीच्या खाली पडल्याने त्यामध्ये एका शेजाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर झाल्याची घटना बुधवारी शहरातील काटई नाका परिसरातील इमारतीत घडली आहे. याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार सिंग असे गुन्हा दाखल झालेल्या शेजाऱ्याचे नाव आहे. तर सादीक कासिम अन्सारी (२६) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

मयत सादीक आणि आरोपी तुषार हे दोघेही भिवंडीतील कटाई भागातील चाचा लाईफ स्टाईल नावाच्या इमारती मधील दुसऱ्या मजल्यावर राहतात. त्यातच बुधवारी रात्री साडेदहा वाजल्याच्या सुमारास मृत सादिकने पिण्याचे पाणी आणले नाही या कारणामुळे दोघात वाद झाला. त्यांनतर दोघांमध्ये हाणामारी सुरु असतानाच,दोघांचाही दुसऱ्या मजल्यावरील पॅसेजमधून तोल जाऊन दोघेही खाली पडले,यामध्ये सादीकच्या नाकातून,पायातून आणि गुप्तांगातून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकच्या नातेवाईकाने निजामपूर पोलीस ठाण्यात तुषार विरोधात तक्रार दिली.

Web Title: One dies after falling from second floor due to water dispute in Bhiwandi

टॅग्स :thaneठाणे