रिजेन्सी अंटेलियात डंपरने चिरडून एकाचा मृत्यू
By सदानंद नाईक | Updated: September 13, 2023 19:37 IST2023-09-13T19:37:10+5:302023-09-13T19:37:23+5:30
उल्हासनगर : शहरातील रिजेन्सी अंटेलिया येथील अंतर्गत रस्त्यावर मॉर्निग वॉक करणाऱ्या सुनील किसनचंद् देवाली यांचा भरधाव डंपरने चिरडल्याने, त्यांचा ...

रिजेन्सी अंटेलियात डंपरने चिरडून एकाचा मृत्यू
उल्हासनगर: शहरातील रिजेन्सी अंटेलिया येथील अंतर्गत रस्त्यावर मॉर्निग वॉक करणाऱ्या सुनील किसनचंद् देवाली यांचा भरधाव डंपरने चिरडल्याने, त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात डंपर चालका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर रिजेन्सी अंटेलिया अंतर्गत रस्त्यावर म्हारळगाव येथील राहणारे ५४ वर्षीय सुनील किसनचंद देवाली हे सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान मिर्निग वॉक करीत होते. त्यावेळी भरधाव आलेल्या डंपरने त्यांना चिरडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून उत्तर तपासणीसाठीत्यांचा मृतदेह शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आला होता.
टिटवाळा पोलीस याप्रकरणी तपास करीत असून पोलिसांनी डंपर चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्याच महिन्यात एका इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून पडून एका मजुरांचा मृत्यू झाला होता. रिजेन्सी अंटेलिया मधील अंतर्गत रस्त्यावर डंपर आलाच कसा? असा प्रश्न नागरिक करीत असून मृत सुनील देवाली यांच्या नातेवाईकांनी अपघात प्रकरणी चौकाशीची मागणी केली आहे.