शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पो झाडाला आदळला; एकाचा मृत्यू तर 19 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 13:18 IST

मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ठाण्यात अपघात झाला आहे. नाशिक-मुंबई मार्गावर झालेल्या या अपघातामध्ये 19 कामगार जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देमजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ठाण्यात अपघात झाला आहे.टेम्पो पलटी झाल्याने आलम शौकत शेख या मजुराचा मॄत्यू झाला आहे. नाशिक-मुंबई मार्गावर झालेल्या या अपघातामध्ये 19 कामगार जखमी झाले आहेत.

ठाणे - कळव्याहून मुलुंडच्या दिशेने जाणार्‍या टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने साकेत येथील झाडावर जावून आदळल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेत एक 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले आहेत. जखमींवर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व मजुर मुंब्रा येथील रहिवाशी आहेत.रविवारी सकाळी सव्वा 9 वाजेच्या सुमारास कळव्याहून साकेतमार्गे मुलुंडच्या दिशेनेे मजुरांना घेवून जाणार्‍या टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने हा टेम्पो रस्त्याच्या कडेला असणार्‍या झाडावर जावून आदळला. या घटनेत आलम शौकत शेख (25) या मजुराच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान, मृत्यु  झाला. तर, मोहम्मद शेख (26), अब्दुल करीम(25), हरुन शेख(19), शाहीद शेख (27), मोहम्मद ताज (19), मोहम्मद शेख (32), चांद अन्सारी (32), इकबाल सलिम शेख (26), इब्रान नाकोदा (39), आहत खान (30), निलान शेख (12), अदनान शेख, परवेज खान(20), मोहम्मद असिफ(19) आदी जखमींची नावे आहे. या जखमी मजुरांच्या डोक्याला, छातीला, हाताला, पायाला मार लागला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यविकीत्सक डॉ. कैलकास पवार यांनी दिली. तसेच या घटनेतील जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सर्जन डॉ. संदिप दरबस्तावर आणि डॉ. निशिकांत रोकडे परिसेविका सुनिता राऊत यांच्या पथकाने तात्काळ रुग्णांवर उपचार केले. तसेच ज्या रुग्णांना सीटी स्कॅन व एमआरआय करण्याची आवश्यक्ता आहे. अशा रुग्णांना इतर रुग्णालयात स्थालंतरीत केले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तसेच या घटनेतील सर्व जखमी हे मुंब्रा येथील राहणारे असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्यतावतीने देण्यात आली.  दरम्यान, या घटनेत बचावलेल्या मजुराने दिलेल्या माहीती नुसार, दररोज मुंबईतील रस्त्यावरील झाडे कापण्यासाठी दररोज ठेकेदारामार्फत पाठवलेल्या वाहनाने आम्ही मुंब्रा येथून जात असतो.  त्यानुसार आज देखिल आम्ही कामसाठी निघालो, मात्र, आज क्षमतेपेक्षा अधिक मजूर या गाडीत होते. त्यामुळे साकेत येथे वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी झाडावर जावून आदळली असल्याचे माहिती बचावलेल्या मजुराने दिली. 

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातDeathमृत्यू