कळव्यात एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:19 IST2018-07-04T00:19:08+5:302018-07-04T00:19:32+5:30
कळवा येथे जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या त्रिकूटास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५०० व १०००च्या एक कोटी ६८ लाख ५० हजारांच्या जुन्या नोटा जप्त केल्या.

कळव्यात एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त
भिवंडी : कळवा येथे जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या त्रिकूटास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५०० व १०००च्या एक कोटी ६८ लाख ५० हजारांच्या जुन्या नोटा जप्त केल्या.
कळवा परिसरात काही व्यक्ती जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार अमित गार्डन येथे त्यांनी सापळा लावला. तेथे येऊन बसलेल्या राजन तेवर, इम्रान शेख व शेखर जाधव यांना ताब्यात घेऊन त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये जुन्या ५०० रुपयांची ३३८ बंडले तर १००० रुपयांच्या १२ नोटा सापडल्या. अधिक चौकशीत ते जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही कारवाई भिवंडी गुन्हे-अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष चौधरी, विकास लोहार, श्रीधर हुंडेकरी, प्रमोद धाडवे या पथकाने केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या नोटा त्यांनी कुठून आणल्या याचा तपास पोलीस करीत आहेत.