अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकाला अटक
By Admin | Updated: June 10, 2017 01:08 IST2017-06-10T01:08:49+5:302017-06-10T01:08:49+5:30
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या राबोडीतील युवकास ठाणेनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.मोलमजुरी

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या राबोडीतील युवकास ठाणेनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
मोलमजुरी करणाऱ्या टेंभीनाक्यावरील एका महिलेची अकरावर्षीय मुलगी झोपलेली असताना इकबाल शरीफ खान (वय २६) याने गुरुवारी रात्री विनयभंग केला. या महिलेच्या मोठ्या मुलीला लॉजवर घेऊन जाण्यासाठी त्याने यापूर्वी चारपाच वेळा मागणी केली होती. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील असून त्याला अटक केल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली.