तोतया वारस दाखवून जमीन विक्री प्रकरणी एकाला अटक; सव्वा दोन कोटींची जमीन अवघ्या साडेपाच लाखांना विक्रीचा केला व्यवहार
By धीरज परब | Updated: August 27, 2024 18:52 IST2024-08-27T18:52:30+5:302024-08-27T18:52:40+5:30
सदर जमीन शासकीय दरा नुसार सव्वा दोन कोटींची असताना अवघ्या ५ लाख ५१ हजारांना त्याची विक्री केली होती . शिवाय अन्य ७ जमिनी सुद्धा विक्रीचा प्रयत्न चालवला होता .

तोतया वारस दाखवून जमीन विक्री प्रकरणी एकाला अटक; सव्वा दोन कोटींची जमीन अवघ्या साडेपाच लाखांना विक्रीचा केला व्यवहार
धीरज परब / मीरारोड - तोतया वारस दाखवून अन्य भाऊ मयत झाल्याचे खोटे दाखले तसेच कागदपत्रे बनवून जमीन विक्री प्रकरणातील तोतया वारसास भाईंदर पोलिसांनी गुजरात मधून अटक केली आहे . सदर जमीन शासकीय दरा नुसार सव्वा दोन कोटींची असताना अवघ्या ५ लाख ५१ हजारांना त्याची विक्री केली होती . शिवाय अन्य ७ जमिनी सुद्धा विक्रीचा प्रयत्न चालवला होता .
कर्नाटकच्या बंगलोर येथे राहणारे दिपक शशिकांत शहा यांच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलीस ठाण्यात २० मार्च २०२४ रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता . दीपक यांचे वडील शशिकांत जिवंत असून , काका प्रविण हरगोविंदास शहा, सूर्यकांत व हरकिशन यांचे निधन झालेले आहे. त्यांचे वारस आहेत . सदर कुटुंबाच्या भाईंदर येथे जमिनी असून काही जमिनी पुरषोत्तम पटेल यांना लीज वर दिल्या होत्या .;
भाईंदर येथील बांधकाम व्यावसायिक अजय धोका हे सदर शाह कुटुंबियांना ओळखत असल्याने शाह कुटुंबाच्या काही जमिनी विक्रीसाठी आल्याचे त्यांना गुजरात वरून समजले . प्रवीण हे मयत झाले असताना त्यांच्या अधिकारपत्र द्वारे जमीन विक्रीची कागदपत्रे अजय यांनी दीपक व कुटुंबियांना कळवली .
त्या नंतर माहिती घेतली असता चंद्रकांत प्रभुदास घेलाणी रा . श्री जी एनक्लेव, सोला भागवत, अहमदाबाद , गुजरात ह्याला प्रवीण शहा दाखवून त्या नावाचाआधारकार्ड, पॅनकार्ड बनवले. गुजरातच्या अमरेली येथील न्यायालयाची दिशाभूल करून खोटे शपथपत्र आदींच्या आधारे अन्य तिघे भाऊ मयत असून त्यांना कोणी वारस नाही आणि तोतया प्रवीण हा भाईंदर येथील सर जमिनींचा एकमेव वारस असल्याचा आदेश मिळवला . त्या आधारे एकाच तारखेचे शशिकांत , सूर्यकांत व हरकिशन शाह यांचे मृत्यूचे दाखले अमरेली येथून मिळवले .
तोतया प्रवीण ह्याने त्याच्या ८ जमिनी पेशइमाम मोहंमद अब्दुल रऊफ, रा. गोम्स चाळ, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, डिमेलो कम्पाऊंड, कुर्ला पश्चिम ह्याला अधिकार पत्र दिले होते . तर एक जमीन हि तोतया प्रवीण याने , बाजारमुल्य २ कोटी २८ लाख असताना ती फक्त ५ लाख ५१ हजारात देवेंद्र मणिलाल धासवाला, रा. शांती निकेशन, श्रीनगर कॉलीनी गोरेगाव पश्चिम व सुरेश जादवनकुम, रा. शिवदर्शन टॉवर, अहिंसा मार्ग , चिंचोली बंदर, मालाड ह्यांना द बॉम्बे सतवारा ज्ञाती ट्रस्ट साठी विक्री केली होती .
कागद्पत्रण मध्ये तसेच ओळखपत्रां मध्ये पत्ता चुकीचा असल्याने तोतया प्रवीण सापडत नव्हता . सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे, उपनिरीक्षक प्रसाद गोवले सह राजेश पानसरे, रविंद्र भालेराव, जानन चव्हाण, राहुल काटकर यांनी तपास करत तोतया प्रवीण उर्फ चंद्रकांत घेलाणी ह्याला अहमदाबाद मधून २४ ऑगस्ट रोजी अटक केली . ठाणे न्यायालयाने त्याला २८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे .