शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वॉर्डबॉयच्या ८० जागांसाठी मुलाखतीला दीड हजार तरुण; केडीएमसीची भरती प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 5:07 AM

गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कल्याण : कोविडशी सामना करण्यासाठी केडीएमसीने चौथ्या टप्प्यांत वॉर्डबॉयच्या ८० जागांसाठी आॅनलाइनद्वारे जाहिरात दिली आहे. त्यामुळे बुधवारी राज्यातील विविध भागांतून जवळपास दीड हजारपेक्षा जास्त तरुण-तरुणींनी मुलाखतीसाठी मनपा मुख्यलयात गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

कोविडशी सामना करण्यासाठी मनपाने यापूर्वी डॉक्टर, नर्स पदासाठी भरती प्रक्रिया राबविली होती. भरतीच्या चौथ्या टप्प्यांत वॉर्डबॉयच्या ८० जागांसाठी आॅनलाइनद्वारे जाहिरात दिली होती. ही भरती कोविडच्या काळापुरती मर्यादित आहे. वॉर्डबॉयसाठी दहावीपर्यंत शिक्षणाची अट असून, प्रत्येकास प्रति महिना १८ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. कोरोना काळात केवळ वैद्यकीय क्षेत्रात नोकर भरती केली जात आहे. वॉर्डबॉयच्या ८० जागांसाठी राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून उमेदवार बुधवारी मनपा मुख्यालयात आले होते. सुभाष मैदानात आधी त्यांची कागदपत्रे जमा करून घेण्यात आली. उमेदवारांना रांगेने सोडण्यात येत असले तरी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते.

धुळे येथून दुचाकीने ४०० किलोमीटरचा प्रवास करून कल्याण गाठणाºया प्रवीण बागूल याने सांगितले की, ‘लॉकडाऊनमुळे ट्रेन, बसची सुविधा नाही. हाताला काम नाही. आॅनलाइनवर वॉर्डबॉयसाठी जाहिरात वाचली. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता धुळ्याहून निघालो. रस्त्यात पाऊस होता. पहाटे ३ वाजता कल्याणमध्ये पोहोचलो. इतका लांबचा प्रवास करून आल्यावर येथे ८० जागांसाठी इच्छुकांची इतकी मोठी गर्दी पाहून आमची निवड होईल का, याबाबत मी साशंक आहे.’नगरहून आले मुलाखतीलाअहमदनगर, पाथर्डी येथील जिरेवाडीचे गणेश आंधळे व सहकाऱ्यांनी कल्याणमध्ये मुलाखतीला येण्यासाठी चारचाकी गाडी भाड्याने घेतली. गाडीच्या इंधनासाठी त्यांना १२०० रुपये खर्च करावे लागले. आंधळे यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका