शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

साडेसहाशे कोटींचा जलमार्ग कराराच्या मसुद्यात रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 23:50 IST

वाहतूककोंडीतून मुक्ती नाहीच : ११ वाहनतळांचा प्रस्तावही रखडलेलाच

सुरेश लोखंडे।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील वाहतूककोंडी दिवसेंदिवस जीवघेणी ठरत आहेत. मुंबईचे प्रवेशद्वार असलेले ठाणे शहर चोहोबाजूंनी वाहतूककोंडीत सापडले आहे. यातून मुक्त करण्यासाठी दिवाळीत घोषित झालेल्या ११ वाहनतळांची उपाययोजना रखडलेली आहे. याशिवाय, पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त असा पहिल्या टप्प्यातील ६६१.१४ कोटींचा जलमार्गही विविध विभागांच्या संयुक्त करारात अडकून पडल्याचे वास्तव उघड झाले आहे.

वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहने थांबवून अन्य वाहनांना प्राधान्याने सोडण्यासाठी ११ वाहनतळे उभारण्याची घोषणा महानगरपालिकेने दिवाळीत केली होती. मात्र, या घोषणेचा लाभ ठाणेकरांना झालेला नाही. याशिवाय, ठाणे महापालिकेच्या जलमार्गाचा पहिला टप्पा २०१६ पासून फायलींमध्येच फिरत आहे. ६६१.१४ कोटी रुपये खर्चाच्या या पहिल्या टप्प्यातील जलमार्ग क्र. ५३ ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी देऊन संयुक्त करार करण्याचे आदेश २४ एप्रिल २०१८ रोजी जारी केले. मात्र, संयुक्त कराराच्या मसुद्यावर विविध विभागांचे एकमत झाले नसल्याचे वास्तव दिशा समितीच्या अहवालावरून उघड होत आहे.

जलवाहतुकीसाठी ठाण्याला ३२ किलोमीटरचा खाडीकिनारा लाभलेला आहे. म्हणूनच, वसई-ठाणे आणि कल्याण या जलवाहतूक मार्ग क्र. ५३ ला मंजुरी मिळाली आहे. या जलमार्गासाठी ६६१.१४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यातून, कोलशेत येथे मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. वसई, मीरा-भार्इंदर, घोडबंदर, नागलाबंदर, काल्हेर, अंजूर दिवे, पारसिक, डोंबिवली (ठाकुर्ली) आणि कल्याण या नऊ ठिकाणच्या खाडीकिनारी जेटी बांधून आवश्यक सुधारणा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मंजूर डीपीआरनुसार जलवाहतुकीच्या पुढील कामासाठी भारतीय आंतरदेशीय जलमार्ग दिल्ली, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौकानयन व जलसंपदा केंद्रीय मंत्रालय आणि ठाणे महानगरपालिका यांच्यातील संयुक्त कराराचा मसुदा केंद्र अद्याप अंतिम झाला नसल्याचे ‘दिशा’च्या अहवालातून उघड झाले आहे.

सल्लागाराकडून जलमार्गांचा अभ्यासजलमार्ग क्र.५३ च्या पहिल्या टप्प्याच्या मंजुरीनंतर दुसऱ्या टप्प्याच्या दोन जलमार्गांवर ६८६ कोटी रुपये खर्चाचे नियोजन आहे. ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते नवी मुंबई हे ते दोन जलमार्ग असून, याबाबत अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराकडून अभ्यास सुरू आहे. ठाणे ते मुंबई या जलवाहतूक मार्गादरम्यान साकेत, कळवा, विटावा, मीठबंदर ऐरोली, वाशी, ट्रॉम्बे, एलिफंटा, फेरीव्हार्फ, गेटवे आॅफ इंडिया या १० ठिकाणी जेटींच्या बांधकामांचे नियोजन आहे. यशिवाय, ठाणे ते नवी मुंबई या जलमार्गासाठी वाशी, नेरूळ, बेलापूर, तळोजा, जुईगाव, पनवेल, जेएनपीटी आणि मोरा या आठ ठिकाणी जेटी बांधून प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्याचे नियोजन आहे. ठाणे पालिकेला प्रथम टप्प्याच्या जलमार्गासाठी केंद्राकडून १०० टक्के अनुदान, तर दुसºया टप्प्यातील दोन जलमार्गांसाठी ५० टक्के अनुदान मिळणार आहे.