मच्छीमारांसाठी साडेतीन हजार कोटींचे पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 06:19 AM2019-11-05T06:19:00+5:302019-11-05T06:19:18+5:30

महादेव जानकर : उत्तनमधील मच्छीमारांच्या नुकसानीचा घेतला आढावा

One and a half crore package for fishermen, mahadev jankar | मच्छीमारांसाठी साडेतीन हजार कोटींचे पॅकेज

मच्छीमारांसाठी साडेतीन हजार कोटींचे पॅकेज

Next

मीरा रोड : सततचा पाऊस, वादळामुळे ऐन मासेमारीच्या हंगामात मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले असून, त्याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी राज्याचे मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी भार्इंदरच्या उत्तन भागास भेट दिली. मच्छीमारांच्या मदतीसाठी साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी आला असून, तुमच्यासाठी शासन तिजोरी रिकामी करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मच्छीमारांसह त्यांच्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणकरांनी जाणून घेतल्या. तसेच त्यांनी समुद्रकिनारी पाहणी केली. मच्छीमारांसह मच्छीमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. त्यांनी दिलेली निवेदने स्वीकारली. मच्छीमारांच्या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे निर्देश यावेळी जानकर यांनी दिले. मच्छीमारांच्या नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजेत. मच्छीमारांसाठी मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केले असून, त्यासाठी साडेतीन हजार कोटी रुपये आले असल्याचे जानकर म्हणाले. राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा भाजप व शिवसेना या मोठ्या पक्षांनी सोडवला पाहिजे, असे सांगत राज्यात पुन्हा भाजपा-शिवसेना व मित्रपक्षांचे सरकार येईल, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कोळी महिलांनी यावेळी जानकर यांच्यावर टीकेची झोड उठवली. मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की, यावेळी आम्ही कोळीबांधवांसाठी काहीतरी करणार. पण, प्रत्येक वेळेला मंत्री येतात आणि कोळीबांधवांना फक्त आश्वासनं देऊन निघून जातात. आमच्या बोटी वादळ-पावसामुळे घरी आहेत. एकेका बोटीवर २५ खलाशी जातात. म्हणजे २५ कुटुंबेएका बोटीवर उदरनिर्वाहासाठी जात असतात. एका खेपेसाठी सुमारे ५० हजारांचा खर्च येतो. पण वादळ-पावसामुळे बोटी रिकाम्या परततात वा जाणेच शक्य होत नाही. समुद्रात अपघात झाला तरी मदत मिळत नाही. आमची तरुण मुलं अपघातात गेली. पण आम्हाला काय मिळतेय, असा सवाल संतापलेल्या महिलांनी केला.

Web Title: One and a half crore package for fishermen, mahadev jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.