शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
4
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
5
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
6
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
7
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
8
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
9
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
10
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
12
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
13
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
14
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
15
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
16
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
17
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
18
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
19
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
20
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
Daily Top 2Weekly Top 5

रेतीमाफियांवरील धडक कारवाईत साडेसहा कोटींचा मुद्देमाल नष्ट; मुंब्रा, कळवा, भिवंडीत छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 00:35 IST

३२ सक्शनपंपांसह २५ बार्ज तोडल्या

ठाणे : अवैध वाळूउत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाने सोमवारी केलेल्या धडक कारवाईमध्ये सुमारे सहा कोटी ४८ लाखांचे साहित्य आणि रेतीसाठा जप्त करून नष्ट केल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिली. यात ३२ सक्शनपंप व २५ बार्ज गॅसकटरच्या साहाय्याने नष्ट केल्या. तर, ३३० ब्रास रेतीसाठा तसेच ५० ठिकाणी रेतीउपशासाठी उभारलेले हौद उद्ध्वस्त केले.ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पारसिक, कळवा रेतीबंदर, काल्हेर रेतीबंदर, वडूनवघर, खारबाव, वेहळे, उल्हास नदी खाडीपात्र, टेंभा, तानसा या परिसरांतील खाडीकिनारी सक्शनपंपांच्या साहाय्याने अवैध रेतीउपसा मोठ्या प्रमाणावर होतो, अशा तक्र ारी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या.

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळपासूनच ठाणे, कल्याण, भिवंडी आणि शहापूर तहसीलदारांनी धडक कारवाई केली. ठाणे तहसीलदार अधिक पाटील आणि त्यांच्या टीमने मुंब्रा पारसिक, कळवा रेतीबंदर आणि गणेशघाट परिसरात कारवाई करून आठ सक्शनपंप आणि आठ बार्ज जप्त करून नष्ट केले. भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड आणि त्यांच्या टीमने सकाळपासूनच कारवाईला सुरु वात करून नऊ सक्शनपंप व सहा बार्ज जप्त करून नष्ट केले. तसेच ३३० ब्रास रेतीसाठा जप्त केला.

कल्याण तहसीलदार दीपक आकडे आणि त्यांच्या टीमनेदेखील उल्हास नदी खाडीपात्रात प्रत्यक्ष उतरून अवैद्य रेतीउपशाविरोधात कारवाई केली. यावेळी कल्याण तालुका हद्दीतील खाडीपात्रातील ११ सक्शनपंप नष्ट करून नऊ बार्ज जप्त केल्या. तसेच २१ हौद उद्ध्वस्त केले. शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने टेंभा व तानसा या दोन ठिकाणी नदीपात्रात कारवाई करून चार सक्शनपंप नष्ट केले. अंबरनाथ तहसीलदार जयराज देशमुख यांनी कारवाई करून दोन सक्शनपंप नष्ट केले.मकोकांतर्गत करणार कारवाईअवैध रेतीउपशाचा धंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चालतो. वारंवार कारवाई करुनही हे धंदे बंद होत नाहीत. बरेचदा कारवायांमध्ये तेचतेच आरोपी आढळतात. आरोपींची ही साखळी मोठी असून, त्यांना पायबंद घालण्यासाठी मकोकांतर्गत कारवाई करण्याचा इशारा महसूल यंत्रणेमार्फत देण्यात आला आहे.

टॅग्स :sandवाळू