शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Mira-Bhyander: एकीकडे हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांचा दावा, दुसरीकडे फटाके स्टॉलना नियमबाह्य परवाने

By धीरज परब | Updated: November 9, 2023 19:15 IST

Mira-Bhyander Municipal Corporation: शहरातील हवेतले प्रदूषण एकीकडे वाढले असताना प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाय योजना करत असल्याचा दावा मीरा-भाईंदर महानगरपालिकेने केला आहे.  

मीरारोड - शहरातील हवेतले प्रदूषण एकीकडे वाढले असताना प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाय योजना करत असल्याचा दावा मीरा-भाईंदर महानगरपालिकेने केला आहे.  परंतु  दुसरीकडे घातक असे प्रदूषणकारी फटाके स्टॉलला वारेमाप नियमबाह्यपणे परवानग्या महानगरपालिकेने हवेतील प्रदूषण रोखण्याचा पालिकेचा हा कांगावा असल्याची टीका होत आहे.

शासनाच्या गृह विभागाच्या आदेशा नुसार देखील सार्वजनिक ठिकाणी , गर्दीच्या ठिकाणी तसेच निवासी इमारती मध्ये फटाके विक्रीस परवाने देता येत नाहीत. भारतीय विस्फोटक कायदा १८८४ नुसार नागरीकांच्या जिवीत आणि मालमत्तेच्या सुरक्षेची काळजी घेणे महापालिका व पोलीसांना बंधनकारक आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा फटाके विक्रीचे परवाने मोकळ्या पटांगणात देण्याचे आदेश दिलेले आहेत.

फटाके विक्री करण्यासाठी मोकळ्या मैदानां मध्ये स्टॉल ना परवानगी देणे,  नागरी वस्ती वा रहदारीचे रस्त्यांवर फटाके स्टॉलना परवानगी देता येत नाही. कारण फटाके हे अतिशय ज्वलनशील असल्याने फटाके दुकानांना आगी लागुन जीवघेण्या दुर्घटना झाल्या असल्याने फटाक्यांच्या विक्री स्टॉल करीता काटेकोर नियम व निकष घालुन दिले आहेत. 

परंतु मीरा भाईंदर महापालिकेने उच्च न्यायालयाचे आदेश , शासन आदेश व भारतीय विस्फोटक कायद्याला धाब्यावर बसवून सर्रास नियमबाह्यपणे भर वर्दळीच्या रस्त्यांवर , नाक्यांवर फटाके विक्री स्टॉल ना परवाने दिले आहेत . विशेष म्हणजे पोलिसांनी देखील महापालिकेच्या पावलावर पाऊल टाकत ना हरकत दिली आहे. 

यंदा पालिकेने ११० फटाके स्टॉल ना परवानगी दिली असून महापालिकेने  इंद्रलोक नाका परिसर, बाळाराम पाटील मार्ग, शिवसेना गल्ली नाका, राहुल पार्क,  मीरारोड रेल्वे स्थानक बाहेरील मार्केट च्या मुख्य रस्त्यांवर, सिल्वर पार्क परिसर, कनकिया व हटकेश  असे शहरात अनेक रस्ते व नाक्यांवर लोकांच्या जीवाशी खेळत  फटाका स्टॉल ना परवाने दिले आहेत. 

हरित फटाके व प्रदूषण न करणाऱ्या फटाक्यांना प्रोत्साहन देण्या ऐवजी महापालिकेने सर्रास घातक असे प्रदूषणकारी फटाके स्टॉल ना नागरीकांच्या जीवाशी खेळत कायदे - नियम धाब्यावर बसवून परवाने दिले आहेत.

हा फटाके स्टॉल परवाना घोटाळा असून या प्रकरणात संबंधित महापालिका अधिकारी यांना निलंबित करावे, त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलम नुसार गुन्हा दाखल करावा . नियमबाह्य प्रदूषणकारी फटाके स्टॉल तोडून साहित्य जप्त करावे अशी मागणी सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता, गो ग्रीन फाउंडेशनचे इरबा कोनापुरे आदींसह अनेक जागरूक नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकfire crackerफटाके