शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

ओमी टीमने घातला खो

By admin | Updated: October 13, 2016 03:41 IST

शहरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याजवळ बेकायदा वाहने पार्किंग करणाऱ्यांवर पालिका पथकाने पाच कोटींची दंडात्मक कारवाई करून नोटिसा पाठवल्या

सदानंद नाईक / उल्हासनगरशहरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याजवळ बेकायदा वाहने पार्किंग करणाऱ्यांवर पालिका पथकाने पाच कोटींची दंडात्मक कारवाई करून नोटिसा पाठवल्या होत्या. दरम्यान, ओमी कलानी टीमने विरोध केल्यावर कारवाई ठप्प झाली असून कोट्यवधींच्या उत्पन्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उल्हासनगरमध्ये पालिकेने चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. पार्किंगच्या समस्येमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल झाला आहे. तत्कालीन पालिका आयुक्त मनोहर हिरे, उपायुक्त नितीन कापडनीस व मालमत्ता व्यवस्थापक गणेश शिंपी यांनी बेकायदा पार्किंग केलेल्या गाडीमालकावर दंड आकारण्याचा निर्णय घेतला. कल्याण-अंबरनाथ रस्त्याजवळ पार्किंग केलेल्या ८९ गाडीमालकांवर तब्बल पाच कोटींची दंडात्मक कारवाई केली. कल्याण-अंबरनाथ रस्त्याजवळ पार्किंग करत असलेल्या गाडीमालकांवर दंडात्मक कारवाई चार महिन्यांपूर्वी केली. ८९ गाडीमालकांविरोधात पाच कोटींची दंडात्मक कारवाई करून रकमेसाठी नोटिसा पाठवल्या. दंडात्मक रक्कम वेळेत न दिल्यास त्यांच्या मालमत्ताकर बिलात ती समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये एकच गदारोळ झाला. ओमी कलानी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांची भेट घेऊन कारवाई थांबवण्याची मागणी केली.