ओमी टीमने घातला खो
By Admin | Updated: October 13, 2016 03:41 IST2016-10-13T03:41:18+5:302016-10-13T03:41:18+5:30
शहरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याजवळ बेकायदा वाहने पार्किंग करणाऱ्यांवर पालिका पथकाने पाच कोटींची दंडात्मक कारवाई करून नोटिसा पाठवल्या

ओमी टीमने घातला खो
सदानंद नाईक / उल्हासनगर
शहरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याजवळ बेकायदा वाहने पार्किंग करणाऱ्यांवर पालिका पथकाने पाच कोटींची दंडात्मक कारवाई करून नोटिसा पाठवल्या होत्या. दरम्यान, ओमी कलानी टीमने विरोध केल्यावर कारवाई ठप्प झाली असून कोट्यवधींच्या उत्पन्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उल्हासनगरमध्ये पालिकेने चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. पार्किंगच्या समस्येमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल झाला आहे. तत्कालीन पालिका आयुक्त मनोहर हिरे, उपायुक्त नितीन कापडनीस व मालमत्ता व्यवस्थापक गणेश शिंपी यांनी बेकायदा पार्किंग केलेल्या गाडीमालकावर दंड आकारण्याचा निर्णय घेतला. कल्याण-अंबरनाथ रस्त्याजवळ पार्किंग केलेल्या ८९ गाडीमालकांवर तब्बल पाच कोटींची दंडात्मक कारवाई केली.
कल्याण-अंबरनाथ रस्त्याजवळ पार्किंग करत असलेल्या गाडीमालकांवर दंडात्मक कारवाई चार महिन्यांपूर्वी केली. ८९ गाडीमालकांविरोधात पाच कोटींची दंडात्मक कारवाई करून रकमेसाठी नोटिसा पाठवल्या. दंडात्मक रक्कम वेळेत न दिल्यास त्यांच्या मालमत्ताकर बिलात ती समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये एकच गदारोळ झाला. ओमी कलानी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांची भेट घेऊन कारवाई थांबवण्याची मागणी केली.