शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

पुणधे येथील पुरातन लेणी नामशेष होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 04:14 IST

गड, किल्ले, लेणी या इतिहासाच्या पाऊलखुणा समजल्या जातात. त्याच्यावरून आपल्या समाजाची, संस्कृतीची तसेच चालीरीतींची ओळख होते.

- वसंत पानसरेकिन्हवली  - गड, किल्ले, लेणी या इतिहासाच्या पाऊलखुणा समजल्या जातात. त्याच्यावरून आपल्या समाजाची, संस्कृतीची तसेच चालीरीतींची ओळख होते.शहापूर शहराजवळील आटगाव-पुणधे येथील इतिहासकालीन पांडवलेणी हा असाच एक अनमोल ठेवा असून सध्या मात्र तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पुरातत्त्व विभागाने वेळीच याकडे लक्ष देऊन त्याचा जीर्णोद्धार करण्याची मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे.मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारादरम्यान आटगाव स्थानक आहे. शहापूरपासून केवळ पाच किमी अंतरावरील आटगावपासून अगदी जवळ म्हणजे केवळ दोन किमीच्या अंतरावर पुणधेजवळ एक टेकडी आहे. या टेकडीच्या शिखरावर भग्नावस्थेत ही लेणी आहेत. या लेण्यांमध्ये अनेक रेखीव शिल्पे आहेत. या लेण्यांची उभारणी केव्हा झाली, ती कुणी बांधली, याविषयी कुठेच माहिती उपलब्ध नाही. मात्र, या लेण्यांचा काळ इ.स. ५५० ते ९०० असावा, असा अंदाज आहे.पुणधेपासून अगदी अर्धा किमीच्या अंतरावरील या लेण्यांकडे पुणधे गावातून जाणारी एक पायवाट आहे. काट्याकुट्यांनी वेढलेल्या या रस्त्याने टेकडी चढल्यावर प्रथम आपणास दिसतात, ते प्रवेशद्वाराजवळील दोन स्तंभ. त्यावर आकर्षक कोरीवकाम असून पुरातनकाळातील शिल्पकलेचा आविष्कार दिसतो. मध्यभागी एक मंदिर असून या मंदिराला घडीव दगडांचा पाया असून त्यावर मोठी शिल्पे दिसतात. या लेण्यांना भेट दिल्यावर काही शिल्पशिला इतस्तत: पडलेल्या दिसतात.या लेण्यांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या आस्थेने येतात. मात्र, इथे पिण्यासाठी पाणी नाही, जाण्यासाठी रस्ता नाही की, विश्रांतीगृहही नाही. रस्त्यावरील दगडगोटे तसेच काट्याकुट्यांमधून रस्ता काढत जावे लागते.सध्या पांडवलेण्यांत करवंदांच्या झाडीत सापडलेल्या देवीची स्थापना करण्यात आली असून अधूनमधून या देवीची पूजा केली जाते. नवरात्र तसेच रामनवमीला येथे उत्सव भरतो. लेण्यांतील अलंकारिक वैभव केव्हाच नष्ट झाले आहे. त्यातील सौंदर्य पुन्हा प्रस्थापित करायचा, असेल तर या लेण्यांच्या जीर्णोद्धाराची गरज आहे.या लेण्यांतील शिलांचे आणि स्तंभांवरील शिल्पांचे घारापुरीतील लेण्यांमधील शिल्पांशी साधर्म्य वाटते. इ.स. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुरबाड, वाडा, म्हसा भागांतील शैवपंथीय तसेच ग्रामदेवतेची मंदिरे मोगलांच्या आक्र मणाने उद्ध्वस्त झाली, असे इतिहास सांगतो. पुणधे येथील भग्नावस्थेतील ही लेणीही बहुधा त्याच्या तडाख्यात सापडली असावीत.ऐतिहासिक वारसा असलेल्या आटगाव-पुणधेतील लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक पर्यटक येतात. मात्र, या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्त्यांची सुविधा नाही. पाणी, रस्ते, विश्रांतीगृह, सुरक्षितता अशा कोणत्याच सुविधा येथे नसल्याने इतिहास अभ्यासक नाराज होतात. येथे मोठ्या प्रमाणात शिल्पे विखुरलेल्या स्थितीत पडून असल्याने ती नामशेष होण्याचा धोका आहे. याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. - राम विशे, इतिहास अभ्यासकवनविभागाकडून याठिकाणी काळजी म्हणून काँक्रि टीकरण करण्यात आले आहे. वनसंवर्धनाप्रमाणेच अशी पुरातन प्राचीन लेणी जोपासली पाहिजे.-सुनील वेखंडे, सचिव, सह्याद्री वनसंवर्धन संस्था

टॅग्स :historyइतिहासthaneठाणे