मुंब्रा बायपास रस्त्यावर ऑईल टँकर पलटी; ३ तास वाहतूक कोंडीत प्रवाशांचे हाल

By कुमार बडदे | Updated: December 12, 2022 07:33 IST2022-12-12T07:31:17+5:302022-12-12T07:33:36+5:30

दरम्यान या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपाच्या  आप्तकालीन कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.

Oil tanker overturns on Mumbra bypass road; Plight of passengers in traffic jam | मुंब्रा बायपास रस्त्यावर ऑईल टँकर पलटी; ३ तास वाहतूक कोंडीत प्रवाशांचे हाल

मुंब्रा बायपास रस्त्यावर ऑईल टँकर पलटी; ३ तास वाहतूक कोंडीत प्रवाशांचे हाल

मुंब्राः येथील बायपास मार्गे अंबरनाथ येथील एका खाजगी कंपनीमध्ये कच्चे खाद्यतेल घेऊन चाललेल्या एजाज उद्दिन या टँकर चालकाचा टँकर वरील ताबा सुटल्याने सोमवारी पहाटे तीन वाजता टँकर मुंब्रा बायपास रस्त्यावर पलटी झाला.यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला खाद्यतेल पसरल्याने दोन्ही दिशेकडील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

स्थानिक वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दोन क्रेनच्या सहाय्याने टँकर रस्त्याच्या एका  बाजूला केल्यानंतर आपत्ती व्यावस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी होज रोलच्या मदतीने रस्त्यावर प्रेशरने पाणी मारुन रस्ता प्रथम स्वच्छ करुन  त्यावर माती टाकल्या नंतर सकाळी सहा वाजता दोन्ही दिशेकडील रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपाच्या  आप्तकालीन कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Oil tanker overturns on Mumbra bypass road; Plight of passengers in traffic jam