शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अरे बापरे! डोंबिवलीत बँक ग्राहकांचे पैसे कोणीतरी दिल्लीतून काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 4:08 PM

बँकेत ठेवलेली कष्टाची पुंजी ही आता सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडलेल्या विचित्र प्रकारांमुळे समोर आली आहे.

ठळक मुद्देरामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॅनरा बँकेमधील सुमारे ७ ग्राहकांना असा विचित्र अनुभव आला.कोणाचे ६० हजार, १५हजार, तर कोणाचे ७० हजार २ हजार अशा विविध स्वरुपात रकमा खात्यातून आपोआप वटल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवली - बँकेत ठेवलेली कष्टाची पुंजी ही आता सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडलेल्या विचित्र प्रकारांमुळे समोर आली आहे. येथील ग्राहकांची विविध बँकांंमध्ये खाती असून त्यातील काही ग्राहकांच्या खात्यातील पैसे अचानकपणे विड्रॉ झाले असून दिल्लीमधून ते वळते झाले आहेत. येथील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॅनरा बँकेमधील सुमारे ७ ग्राहकांना असा विचित्र अनुभव आला असून त्यांच्या खात्यातील सुमारे सव्वा दोन लाखांची कॅश ही दोन दिवसांपासून आपोआप वळती झाली आहे.

प्राथमिक माहितीनूसार ही घटना गुरुवार रात्रीपासून घडल्याचे बँक प्रशासनाच्या निदर्शनास आले असून ग्राहकांनी त्यासंदर्भात रामनगर पोलिस ठाण्यात  तक्रारी दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. कॅनरा बँक ही पूर्वेकडील पाटकर रोड नजीक असून तेथिल सात ग्राहकांना हा अनुभव आला असून त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्या सात जणांमध्ये दोन महिला, तर अन्य पुरुष असल्याचेही सांगण्यात आले.

कोणाचे ६० हजार, १५हजार, तर कोणाचे ७० हजार २ हजार अशा विविध स्वरुपात रकमा खात्यातून आपोआप वटल्याची माहिती समोर आली आहे. रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयसिंग पवार यांनीही ‘लोकमत’च्या वृत्ताला दुजोरा दिला असून या प्रकरणाची माहिती या पोलिस ठाण्याचा गुन्हे विभाग पोलिस अधिकारी आणि अन्य कर्मचारी करीत असून सध्या ते बँकेत माहिती घेण्यासाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

बँक प्रशासनाशी संपर्क साधला असता ही घटना घडली असून त्यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली असून ग्राहकांनी तक्रारीही दिल्याचे सांगण्यात आले. नेमका हा प्रकार एटीएम तसेच अन्य कशामुळे घडला आहे का याचीही चाचपणी करण्यात येत आहे. तसेच नेटबँकींग मुळे ही घटना घडली असण्याचीही शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

परेश बोंडीवले हे रामनगरला रहात असून पूर्वेकडील पाटकर रोडच्या कॅनरा बँकेत त्यांचे खाते आहे. शुक्रवारी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्यांच्या वाहनात त्यांनी पेट्रोल भरले होते, पण मोबाईल अलर्ट मेसेज आला तेव्हा मध्ये चेक केले तेव्हा कळले की खात्यातून हजार बाराशे एवेजी तब्बल दहा हजार वळते झाले आहेत. त्यानूसार त्यांनी बँकेत चौकशी केली तेव्हा त्यांना बँकेने सांगितले की, अशा काही खातेदारांच्या घटना घडल्या असून त्यासंदर्भात पोलिस तक्रार द्यावी, त्यानूसार त्यांनी तातडीने शनिवारी सकाळी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून त्याची एक प्रत बँकेत जमा केल्याचेही बोंडीवाले यांनी ‘लोकमत’सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाbankबँक