चिनी वस्तूंवर बहिष्कारासाठी घेतली शपथ
By Admin | Updated: October 12, 2016 04:35 IST2016-10-12T04:35:59+5:302016-10-12T04:35:59+5:30
भारताच्या विरोधात पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनला धडा शिकविण्यसाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी अंबरनाथमधील मोहन

चिनी वस्तूंवर बहिष्कारासाठी घेतली शपथ
अंबरनाथ : भारताच्या विरोधात पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनला धडा शिकविण्यसाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी अंबरनाथमधील मोहन पुरम मित्र मंडळाने सेवानिवृत्त कर्नल शाशिकांत पेंढारकर यांच्या उपस्थितीत शपथ घेण्यात आली. भारतात अनेक वस्तू चीनमधून येत असल्याने चीनच्या अर्थकारणात भारताचा मोलाचा वाटा आहे. असे असतानाही चीन भारताच्या विरोधात काम करत आहे. त्यामुळे चिनी वस्तूचा वापर टाळावा आणि या पुढे चीनमध्ये निर्मिती झालेली वस्तू विकत न घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला. येथील रहिवासी आणि लहान मुलांना या संदर्भात शपथ देण्याचा प्रयत्न मंडळाने घेतला. राजेश नाडकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला. शपथ घेण्यासाठी नागरिक आणि मुले सहभागी झाले होते.