शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या अधिक : डॉ. कुसुममाला यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 19:19 IST

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह अंतर्गत ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.

ठळक मुद्दे आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या अधिक : डॉ. कुसुममाला जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह अंतर्गत ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने कार्यक्रमजगात प्रत्येक ४० सेकंदाला एक आत्महत्त्या

ठाणे: जगात प्रत्येक ४० सेकंदाला एक आत्महत्त्या होते. महिलांच्या तुलनेत आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या अधिक आहे. दरवर्षी भारतात एक लाख पुरूषांमध्ये २५ पुरूष तर एक लाख महिलांमध्ये १६ महिला आत्महत्त्या करतात अशी माहिती प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कुसुममाला यांनी दिली. आत्महत्त्या करण्याचा विचार ज्यांच्या मनात येतो अशांनी कुटुंब, नातेवाईक, मित्र मैत्रिणी किंवा एखाद्या मानसोपचारतज्ज्ञांकडे व्यक्त व्हावे असा सल्लाही त्यांनी दिला.              प्रादेशिक मनोरु ग्णालय ठाणे येथे शुक्रवारपासून जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येत असून त्याअंतर्गत टाटा मोटर्स येथे आत्महत्त्या प्रतिबंध या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी मानसीक आरोग्याविषयी माहिती देणारे प्रदर्शनही लावण्यात आले होते. दरम्यान, एमफील सायकॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी आत्महत्त्या करु नका असा संदेश देणारे एक नाटीका सादर केली. २० ते ५० वयोगटातील लोकांमध्ये आत्महत्त्येची भावना येत असते. पुरूष जास्त व्यक्त होत नसतात म्हणून त्यांची संख्या अधिक असल्याचे सांगताना डॉ. कुसुममाला म्हणाल्या की, पुरूष खूप धोकादायक पद्धतीने आत्महत्त्या करतात. स्वत:ला शुट करणे, लटकणे किंवा ट्रेनखाली येऊन आत्महत्त्या करतात. महिला तितक्या धोकादायक पद्धतीने करत नाही, गोळ््या घेऊन किंवा हात कापून त्या आत्महत्त्या करतात. मानसीक तणाव, नैराश्य, एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असणे, आर्थिक, मानसीक किंवा कुटुंबाचा पाठिंबा नसले तसेच, घरातील सदस्याने किंवा आजूबाजूला कोणी आत्महत्त्या केली असेल तर ते पाहूनही आत्महहत्त्या होत असल्याची कारणे डॉ. कुसुममाला यांनी स्पष्ट केली. अशा व्यक्ती कशा ओळखाव्या यासंदर्भात बोलताना त्यांनी काही संकेत सांगितले. त्या म्हणाल्या, ती व्यक्ती मरणाच्या गोष्टींबद्दल बोलत असेल, इच्छापत्र बनवून घेत असेल, मी मेलो तर बरे होईल, माझ्यासाठी कोण नाही असे बोलत असेल, रागाच्या भरात वाहन चालवत असेल असे अनेक संकेत असतात. अशी व्यक्ती उदासीन, चिंतेत आणि ताणतणावात असते. जगात दहा आत्महत्त्या होत असतील तर त्यातील चार आत्महत्त्या भारतात होतात, भारत हा ताणतणावाचा देश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आत्महत्त्येचा विचार कोणालाही येऊ शकतो, परंतू ज्यांना मानसीक आजार आहे त्यांच्यात ही भावना तीव्र असल्याचे डॉ. कुसुममाला यांनी सांगितले. सामान्यांनी कशा प्रकारे मानसीक रुग्णांशी वागावे याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, मानसीक आजार झालेल्या व्यक्तीला एकटे सोडू नका, त्यांच्यात मिळून मिशलून रहा, त्यांना समजून घ्या असे सांगितले. आत्महत्त्या ही रोखली जाऊ शकते असेही त्या म्हणाल्या. यावेळी टाटा मोटर्सचे सीएसआरचे प्रमुख विनोद कुलकर्णी, मनोविकृतीतज्ज्ञ परिचारक दत्तात्रय कार्डिले, व्यवसाय उपचारतज्ज्ञ रुपा किणकर, समाजसेवा अधिक्षक फरिदा शेख, सुरेखा वाठोरे व इतर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेmental hospitalमनोरूग्णालयWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना