शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात क्रिटिकल रुग्णसंख्या सात हजार ६००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 23:26 IST

व्हेंटिलेटरवर ५७५ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत नोंदणी झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या चार लाख ७२ हजारांहून अधिक असून, त्यामधील सुमारे सात हजार ५८४ जण क्रिटिकल झोनमध्ये राहिले आहेत. त्यामध्ये सात हजार नऊ जणांना ऑक्सिजनची कमतरता भासली आहे. उर्वरित ५७५ जण हे व्हेंटिलेटरवर असल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे. यापैकी सहा हजार ४८१ रुग्ण जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रातील आहेत, तर नगरपालिका आणि ग्रामीण भागात ११२ रुग्ण आहेत.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली. २६ मार्च रोजी कोरोना रुग्णांची संख्या ही तीन लाख २ हजार ५५९ इतकी होती. ती संख्या आता चार लाख ७२ हजार ७९० वर पोहोचली आहे. यावरून कोरोनाच्या लाटेचा अंदाज येऊ शकतो. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ७२ हजार ७९० कोरोनाग्रस्तांपैकी चार लाख २७ हजार ५५८ जणांनी कोरोनाला हरवले आहे, तर सात हजार ६९१ जणांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आहे. सध्या जिल्ह्यात ३७ हजार ५४१ जण कोरोनाशी दोन हात करत आहेत. यापैकी ७ हजार ५८४ जण क्रिटिकल आहेत. यामध्ये सात हजार नऊ जणांना ऑक्सिजनची आवश्यक आहे. ५७५ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सहा महापालिका कार्यक्षेत्रात ५ हजार ९४७ जणांना ऑक्सिजन, तर ५३४ जण व्हेंटिलेटरवर आहेत. नगरपालिकांमध्ये ९५६ जण ऑक्सिजन, तर ३५ जण व्हेंटिलेटरवर असून, ग्रामीण भागात १०६ जण ऑक्सिजन, तर अवघे सहा जण व्हेंटिलेटरवर असल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे. महापालिका या दृष्टीने आवश्यक त्या उपाययाेजना करत आहे.

nत्यापैकी २५२ जणांना ऑक्सिजन, तर २५ रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे दिसत आहे. दिलासादायक म्हणजे ग्रामीण भागात जरी रुग्णसंख्या तीन हजार ४३ इतकी असली, तरी तेथे १०६ जणांना ऑक्सिजनची, तर ६ जणांना व्हेंटिलेटरची गरज लागल्याचे दिसत आहे. nमहापालिका आणि नगरपालिका क्षेत्रापेक्षा ग्रामीण भागात परिस्थिती उलटी असल्याचे प्रखरतेने जाणवत आहे.

nपहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची सर्वांत कमी नोंदणी जिल्ह्यातील भिवंडी महापालिका हद्दीत झाली. भिवंडीत सध्याच्या घडीला कोरोनाबाधित म्हणून उपचारार्थ ४०१ रुग्ण दाखल आहेत.

जिल्ह्यातील रुग्णांचा तक्तास्वराज संस्था    उपचारार्थ     ऑक्सिजन    व्हेंटिलेटरठामपा    ८७८४    ९८३    १७९नवी मुंबई    ५८०६    १६९५    २००केडीएमसी    १०९६२    १९५९    ०४०मीरा-भाईंदर    ३९०४    ९११    ०८९भिवंडी    ०४०१    २५२    ०२५उल्हासनगर    १४४५    १४७    ००१अंबरनाथ    १७४९    ४४८    ०१२बदलापूर    १४४७    ५०८    ०२३ठाणे ग्रामीण    ३०४३    १०६    ००६एकूण    ३७५४१    ७००९    ५७५

 

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका