जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या थोडी घटली, ५,५६६ नवे रुग्ण तर ३३ दगावले   

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 09:51 PM2021-04-14T21:51:42+5:302021-04-14T21:51:54+5:30

ठाणे शहर परिसरात १६७७ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख हजार ३४१ झाली आहे. शहरात ६ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ५२५  झाली आहे

The number of corona patients in the district decreased slightly, with 5566 new patients and 33 new cases in thane | जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या थोडी घटली, ५,५६६ नवे रुग्ण तर ३३ दगावले   

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या थोडी घटली, ५,५६६ नवे रुग्ण तर ३३ दगावले   

Next
ठळक मुद्देठाणे शहर परिसरात १६७७ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख हजार ३४१ झाली आहे. शहरात ६ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ५२५  झाली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग थोडा मंद झाल्याचे दिसले तर मृत्यूदर वाढलेला दिसत आहे.  बुधवारी ५५६६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ३ लाख ९५ हजार ६९० रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ३३ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ६ हजार ७९४ झाली आहे. 
     
ठाणे शहर परिसरात १६७७ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख हजार ३४१ झाली आहे. शहरात ६ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ५२५  झाली आहे. पाठोपाठ कल्याण - डोंबिवलीतही संख्या वाढतेच असून याठिकाणी १३९० रुग्णांची वाढ झाली असून ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ११०९ रुग्णांची वाढ झाली असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये २४१ रुग्ण सापडले असून २ मृत्यूची नोंद झाली आहे. भिवंडीत ७२ बाधीत असून  मृत्यूची नोंद नाही.  मीरा भाईंदरमध्ये ३७1 रुग्ण आढळले असून ७ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये ३५९ रुग्ण आढळले असून ३ जनाच्या  मृत्यू नोंद आहे. बदलापूरमध्ये २१९ रुग्णांची नोंद झाली असून ४ मृत्यूची नोंद जाली. ठाणे ग्रामीणमध्ये १२७ नवे रुग्ण वाढले आहेत. तर २ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या २२ हजार ६२३ झाली असून आतापर्यंत ६२४ मृत्यूंची नोंद आहे.

Web Title: The number of corona patients in the district decreased slightly, with 5566 new patients and 33 new cases in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.