शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

ठाणे जिल्ह्यातील अपघात बळींची संख्या ४८ ने घटली, उपाययोजना ठरल्या प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 01:45 IST

राज्यातील अपघातांची संख्या वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासकीय यंत्रणा कामाला लागल्या. त्याचे सकारात्मक परिणाम आकडेवारीतून उघड झाले आहेत.

- पंकज रोडेकरठाणे - राज्यातील अपघातांची संख्या वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासकीय यंत्रणा कामाला लागल्या. त्याचे सकारात्मक परिणाम आकडेवारीतून उघड झाले आहेत. जिल्हा प्रशासनाला ठाणे जिल्ह्यातील अपघातांसोबतच, त्यामधील बळींची संख्याही गतवर्षीच्या तुलनेत ४८ ने कमी करण्यात यश आले. अपघातांमधील बळींची संख्या घटवण्यात ठाणे जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब असली तरी, दुसरीकडे ब्लॅक स्पॉट्सची अर्थात अपघातप्रवण स्थळांची संख्या दोनने वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.अपघातांची वाढती संख्या लक्षात घेत, सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी संबंधित यंत्रंणांना काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार, मध्यंतरी संबंधित यंत्रणांची दर गुरूवारी नियमीत बैठक घेतली जात होती. लोकसभा निवडणुकीनंतर २ मे रोजी निवासी जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी पुन्हा बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी पावसाळा डोळ्यासमोर ठेवून काही सूचना केल्या. यावेळी जिल्ह्यातील अपघातांची संख्या घटली असून, बळींची संख्याही ४८ ने कमी घटल्याची आकडेवारी मांडण्यात आली. वाहतुकीसंदर्भात आरटीओ, ठाणे शहर वाहतूक शाखा आणि महामार्ग पोलिसांनाही महामार्गांवर सद्यस्थितीत कुठे दुभाजक तोडले आहेत का? तसेच दुभाजक झिजल्याने रस्त्याच्या समांतर आले आहेत का? याबाबत पाहणी करून विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश यावेळी त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे-नवी मुंबईत नवे ब्लॅक स्पॉट्सजिल्ह्णात १०७ ब्लॅक स्पॉट्स होते. त्यामध्ये दोनने वाढ झाल्याने ही संख्या १०९ झाली आहे. हे स्पॉट्स ठाणे शहरातील गायमुख आणि नवीमुंबईतील घनसोली पुलाजवळ असल्याचे सूत्रांनी सांगितले.खर्डीजवळ लवकरचट्रामा सेंटर?नाशिक महामार्गावर होणाºया अपघातांमधील अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळावे, यासाठी या बैठकीत खर्डीजवळ ट्रामा सेंटर उभारावे आणि त्यासाठी लागणाºया जागेची पाहणी करण्याचे आदेश ठाणे जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले आहेत.राज्यात ठाणे एक नंबरवरअपघातातील बळींची संख्या जानेवारी ते मार्च २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये ४८ ने कमी झाली आहे. एवढ्या प्रमाणात ही संख्या घटवणारा ठाणे जिल्हा राज्यात एक नंबरवर आहे. त्याखालोखाल पुणे ३२, मुंबई २४, औरंगाबाद २३, तर अमरावतीमध्ये बळींची संख्या १३ ने कमी झाली.५० पत्रकारांचेहोणार शिबिरअपघातांबाबत वृत्तसंकलन करणाºया ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथील ५० पत्रकारांचे एक शिबिर लवकरच आयोजिण्यात यावे. यामध्ये त्यांना नेमका अपघात आणि त्याच्या जनजागृतीबाबत मुंबईच्या धर्तीवर धडे द्यावे, असे म्हटले आहे.

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे