आता ग्रामसेवकांचे ‘कामबंद’ सुरू

By Admin | Updated: November 18, 2016 02:06 IST2016-11-18T02:06:09+5:302016-11-18T02:06:09+5:30

महाराष्ट्रातील ग्रामसेवकांनी आज ग्र्रामपंचायतीच्या चाव्या व शिक्के गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून काम बंद केल्याने सगळ्याच ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प होणार आहे.

Now the Gramsevak's 'Kambandand' is going on | आता ग्रामसेवकांचे ‘कामबंद’ सुरू

आता ग्रामसेवकांचे ‘कामबंद’ सुरू

विक्रमगड: महाराष्ट्रातील ग्रामसेवकांनी आज ग्र्रामपंचायतीच्या चाव्या व शिक्के गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून काम बंद केल्याने सगळ्याच ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प होणार आहे.  
ग्रामसेवकावरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे शासनाच्या अनेक योजना तसेच राजकीय दबाव यामुळे ग्रामसेवक होरपळून निघाले आहेत. ही स्थिती दूर व्हावी व पुढील मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी हे आंदोलन आहे. जॉबचार्ट, नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, ग्रामसेवक भरतीासाठी शैक्षणिक अर्हता पदवीधर असावी, ग्रामसेवकला मारहाण हा अजामीनपात्र गुन्हा ठरवावा, २००५ नंतर च्या ग्रामसेवकाना जुनी पेन्शन लागू करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा ३ वर्षांचाचा सेवाकाळ धरावा, प्रवास भत्ता ३००० करणे, ग्रामसेवकांविरुद्ध दाखल झालेल्या फौजदारी केसेस मागे घेणे, २०११ च्या लोकसंख्येनुसार ग्रामविकास अधिकाऱ्याचे पद निर्माण करणे यासह इतर मागण्यासाठी गुरूवारपासून राज्यात असहकार व कामबंद आंदोलन केले गेले आहे. शासनाने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असल्याचे ग्रामसेवक युनियनचे जिल्हा अध्यक्ष सुचित घरत यांनी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या विकास आणि दैनंदिन कार्यात ग्रामसेवकाची भूमिका महत्वाची असते. त्याच्याशिवाय पंचायतीचा कारभार चालूच शकत नाही. त्यामुळे या आंदोलनाचा फटका त्यांना बसणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Now the Gramsevak's 'Kambandand' is going on