ठाण्यात आता १४ मोबाइल टॉयलेट

By Admin | Updated: April 24, 2017 02:24 IST2017-04-24T02:24:21+5:302017-04-24T02:24:21+5:30

स्मार्ट सिटीत निवड झालेल्या ठाणे शहराची लोकसंख्या ही २२ लाखांच्या घरात गेली आहे. ती लक्षात घेता, नागरिकांना शौचालयांची आवश्यकता पडणार आहे.

Now 14 mobile toilets in Thane | ठाण्यात आता १४ मोबाइल टॉयलेट

ठाण्यात आता १४ मोबाइल टॉयलेट

ठाणे : स्मार्ट सिटीत निवड झालेल्या ठाणे शहराची लोकसंख्या ही २२ लाखांच्या घरात गेली आहे. ती लक्षात घेता, नागरिकांना शौचालयांची आवश्यकता पडणार आहे. त्यानुसार, महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदारीमुक्त ठाणे ही संकल्पना राबवण्यासाठी शहरात विविध १४ ठिकाणी मोबाइल टॉयलेटच्या सुविधा देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
ठाणे शहरांतर्गत ज्याज्या वेळी एखाद्या सार्वजनिक कार्यक्र माचे आयोजन केले जाते, तेव्हा त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना शौचालयांची कमतरता नेहमीच भासते. परिणामी, अशा वेळेस मोठ्या प्रमाणात अस्वच्छता शहरात पसरून त्यातून रोगराई होण्याचा धोकाही संभवतो. यावर उपाय म्हणून शहरात १४ मोबाइल टॉयलेट वाहने विकत घेण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्याकरिता, यंदाच्या अर्थसंकल्पात २५ लाख रु पयांच्या निधीची तरतूद केली आहे. या मोबाइल टॉयलेटअंतर्गत एका मोठ्या ट्रकवर हे शौचालय उभे असणार असून तिथेच पाण्याची व्यवस्था आणि अन्य सुविधा असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे याकरिता ठाणे महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
दरम्यान, ठामपाच्या हद्दीत शौचालयांच्या कमतरतेचा मुद्दा नेहमीच गाजतो आहे. आजघडीला किसननगर, लोकमान्यनगर, इंदिरानगर, कळवा, मुंब्रा, वर्तकनगर, वागळे इस्टेट, या पट्ट्यांत शौचालयाअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होते. ठामपाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात काही शौचालये बांधली आहेत. परंतु, अनेक ठिकाणी त्यांची दुरवस्था आहे. याबाबत नेहमीच ओरड होते. (प्रतिनिधी)

Web Title: Now 14 mobile toilets in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.