शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी : शहापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 03:58 IST

किन्हवली तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारून उघडीप दिली असून कडक उन्हामुळे जोमाने वाढलेली भातपिके तडकली असून शेतकरी धास्तावला आहे.

किन्हवली - तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारून उघडीप दिली असून कडक उन्हामुळे जोमाने वाढलेली भातपिके तडकली असून शेतकरी धास्तावला आहे. या तडकलेल्या भातशेतीमुळे आता काय करायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे.तालुक्यात १४ हजार हेक्टर जमिनीवर भातपिकाचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी तरी आपल्या पदरी विनासंकट भातपिके पडतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, शेतावर अनेक रोग पडले आणि १५ दिवस पावसाने उघडीप दिल्याने माळरानातील भातजमिनी तडकल्या. परिणामी, भातपिके कोमेजली.येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर मात्र भातशेतीच्या उत्पन्नावर मोठी आफत येऊन त्याचे मोठे नुकसान होणार आहे. पावसाअभावी शेतीची अशीच स्थिती राहिली, तर यावेळी भातपिके जळून जाण्याची स्थिती आहे. या परिस्थितीत शेतीला पावसाची आवश्यकता असून आता भाताच्या आत दाणा तयार होत असताना पाण्याची नितांत गरज आहे. सोसायटीचे कर्ज काढून शेतकºयांनी शेती लावली असून विकत बियाणे आणि खते मारून तयार केलेल्या भातशेतीवर पावसाने दडी मारल्याने करप्या, बगळ्या हे रोग पडतात. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.पावसाअभावीभात शेती तडकलीभातसानगर : शहापूर तालुक्यात पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने जोमाने वाढलेली भात पीके उन्हाने तडकल्याने शेतकरी धास्तावला आहे.या तडकलेल्या भात शेतीमुळे आता काय करायचे असा प्रश्न त्याच्या समोर येवून ठेपला आहे. तालुक्यात १४ हजार हेक्टर जमिनीवर भात पिकांचे उत्पादन घेतले जाते. या वर्षी तरी आपल्या पदरी विना संकट भात पीके पडतील अशी आशा असताना गेले काही दिवसापासून शेतावर अनेक रोग पडलेले असतानांच आता गेले पंधरा दिवस पावसाने उघडीप दिल्याने माळरानातील भात जमीनी तडकल्याने भात पीके कोमेजुन जावू लागल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे. जर आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर मात्र त्यांचे मोठे नुकसान होणार आहे.आता शेतकºयांचे लक्ष पावसाकडे असून पाऊस कधी पडतो अशी चिंता त्यांना लागली आहे. कारण सध्याच्या परिस्थिति शेतीला पावसाची आवश्यकता आहे.सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांनी भातशेतीची कामे वेळीच केली. चालू वर्षी पीक चांगले येईल, या आशेवर असतानाच पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेला घास शेतकºयांच्या तोंडून निघून जाणार आहे.- मल्हारी चंदे, शेतकरी / शेतकरी मार्गदर्शककिन्हवली परिसरात पावसाचे प्रमाण कमी आहे व आता भातपीक पोटरीवर आहेत. पावसाने दडी मारल्यावर पिकांचे नुकसान होऊन भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.- दिलीप कापडणीस, कृषी अधिकारी, शहापूर

टॅग्स :Farmerशेतकरीshahapurशहापूर