ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभांसाठी ६४ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 08:07 PM2019-10-03T20:07:49+5:302019-10-03T20:16:01+5:30

जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रापैकी भिवंडी ग्रामीणला दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर भिवंडी पूर्वमध्ये चार जणांनी सात अर्ज दाखल केले आहेत. भिवंडी पश्चिममधून पाच उमेदवारांनी दहा अर्ज भरले आहेत. शहापूरमध्ये चार उमेदवारी अर्ज आले आहेत.....

Nomination papers of 64 candidates for 18 Assembly constituencies in Thane district | ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभांसाठी ६४ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र

चौथ्या दिवशी जिल्ह्यातील १८ मतदार संघामध्ये ६४ उमेदवारांनी त्यांचे ८२ नामनिर्देशनपत्र

Next
ठळक मुद्दे१८ मतदार संघामध्ये ६४ उमेदवारांनी त्यांचे ८२ नामनिर्देशनपत्र उल्हासनगला सहा जणांचे आठ उमेदवारी अर्जबेलापूरला आठ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी आजच्या चौथ्या दिवशी जिल्ह्यातील १८ मतदार संघामध्ये ६४ उमेदवारांनी त्यांचे ८२ नामनिर्देशनपत्र गुरूवारपर्यंत दाखल केले आहेत,असे ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
         जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रापैकी भिवंडी ग्रामीणला दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर भिवंडी पूर्वमध्ये चार जणांनी सात अर्ज दाखल केले आहेत. भिवंडी पश्चिममधून पाच उमेदवारांनी दहा अर्ज भरले आहेत. शहापूरमध्ये चार उमेदवारी अर्ज आले आहेत. तर कल्याण पश्चिमला पाच जणांनी सहा अर्ज दाखल केले. मुरबाडला दोन अर्ज आले. अंबरनाथमध्ये तीन अर्ज, उल्हासनगला सहा जणांचे आठ उमेदवारी अर्ज तर कल्याण पूर्वमध्ये तीन उमेदवारांनी चार अर्ज भरले आहेत. डोंबिवली मतदारसंघात दोन अर्ज आले आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये तीन उमेदवारांचे चार अर्ज आहेत. मीरा भार्इंदरला पाच उमेदवारांचे आठ अर्ज आहेत. ओवळा माजीवडामध्ये पाच उमेदवारी अर्ज आहे. कोपरी पाचपाखाडीत दोन उमेदवारी अर्ज आले. ठाणेत दोन जाणांनी चार अर्ज भरले. मुंब्रा कळवामध्ये दोन उमेदवारांनी तर ऐरोलीत अद्याप एक आणि बेलापूरला आठ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

Web Title: Nomination papers of 64 candidates for 18 Assembly constituencies in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.