शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अख्तरांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटत नाही - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 05:53 IST

जितेंद्र आव्हाड : डोंबिवलीत ‘राष्ट्रवादी’ च्या कार्यालयाचे उद्घाटन

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्वेतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी ते बाेलत हाेते. त्यांनी राष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक विषयांवर भाष्य केले

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली :  गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत आरएसएस आणि इतर संघटनांची तुलना तालिबानशी केल्याने एकीकडे वादंग उठले आहे. यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे जावेद अख्तर जे बोलले, त्याबाबत काहीही आश्चर्य वाटले नाही. त्या वादात मी पडणार नाही, असे मत डोंबिवली येथे व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्वेतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी ते बाेलत हाेते. त्यांनी राष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक विषयांवर भाष्य केले. प्रत्येक पक्षाला आपली ताकद आजमावून पाहायची असते. त्याप्रमाणे आज जे चित्र मला दिसत आहे, ते निश्चितच पक्षासाठी उत्साहवर्धक आहे. आर. आर. पाटील यांच्या कालावधीत जो उत्साह होता तो आज दिसत आहे. आयत्या वेळेस घोटाळा नको. त्यामुळे स्वबळाची तयारी सुरू असल्याचे आव्हाड म्हणाले. 

खड्ड्यांच्या मुद्यावर ते म्हणाले की, ठाण्यासह सगळीकडेच खड्डे आहेत. कळवा-मुंब्रा येथे कधी काळी सर्वाधिक खड्डे असायचे, पण दहा वर्षांत खड्डे पडलेले नाहीत. त्याठिकाणी येणारे काँक्रिटही मी तपासून टाकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सत्तेचा प्रमुख कोण आहे या प्रश्नावर आव्हाड यांनी महाविकास आघाडीचे सरकार जरी असले तरी सर्वांत जास्त आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे तेच प्रमुख असल्याचे स्पष्ट केले. माजी खासदार आनंद परांजपे यांनी बीएसयूपी घोटाळा बाहेर काढला होता. मात्र, त्याकडे कुणी लक्ष दिले नाही. आजही लाभार्थी घरांच्या प्रतीक्षेत असल्याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले. यावेळी महेश तपासे, जगन्नाथ शिंदे, प्रमोद हिंदुराव यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, अख्तर यांच्या विधानावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. यातून आता राजकारणही तापू लागल्याचे देशासह राज्यात दिसून येत आहे.

तिसऱ्या लाटेबाबत बेफिकिरी नकाे!मुख्यमंत्र्यांनी कोरोनाकाळात जी कामगिरी केली त्याची दखल सगळ्यांनीच घेतली आहे. परदेशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने कहर केला आहे. ही लाट भारतात येण्याची शक्यता आहे. त्या लाटेबाबत बेफिकिरी दाखवू नका, असा सूचक इशारा आव्हाड यांनी यावेळी दिला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी झाली होती. यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. 

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरJitendra Awhadजितेंद्र आव्हाड