कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, एकनाथ शिंदे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 10:16 AM2022-05-04T10:16:03+5:302022-05-04T10:26:01+5:30

सरकारने घालून दिलेले नियम सर्वसामान्य माणसाला, राजकारण्यांना किंबहुना मंत्र्यांनादेखील सारखेच आहेत, एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य.

No one has the right to take the law into their own hands says shiv sena Eknath Shinde raj thackeray loudspeaker | कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, एकनाथ शिंदे यांचे मत

कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, एकनाथ शिंदे यांचे मत

Next

ठाणे : कायदा, नियम हे सर्वांना सारखे असतात. सरकारने घालून दिलेले नियम सर्वसामान्य माणसाला, राजकारण्यांना किंबहुना मंत्र्यांनादेखील सारखेच आहेत. त्यामुळे नियमांचे पालन करायला हवे. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नसल्याचा टोला राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना लगावला.

वागळे इस्टेट, श्रीनगर येथे ठाणे महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा व  खासगी रुग्णालयाच्या सहकार्याने नव्याने उभारण्यात आलेल्या मातोश्री गंगूबाई संभाजी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा शिंदे यांच्या हस्ते व महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा टोला लगावला. 

नियमाप्रमाणे सर्वांनी वागायला हवे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पालिकेच्या टीबीमुक्त ॲपचे लोकार्पण केले. 

Web Title: No one has the right to take the law into their own hands says shiv sena Eknath Shinde raj thackeray loudspeaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.