शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: उद्या नवी मुंबई, ठाण्यात बंद नाही; क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 10:49 IST

लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून बंद रद्द

मुंबई: ठाणे आणि नवी मुंबईत उद्या बंद न पाळण्याचा निर्णय मराठा समाजाकडून घेण्यात आला आहे. वारंवार बंद पाळून लोकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं ठाणे आणि नवी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर या दोन शहरांमधील समन्वयकांनी बंद न पाळण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या (9 ऑगस्ट) महाराष्ट्र बंद पाळण्याची हाक मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आली होती. नवी मुंबई आणि ठाण्यात उद्या बंद पाळण्यात येणार नाही. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी समन्वयकांनी हा निर्णय घेतला आहे. बंदऐवजी ठिय्या आंदोलन करुन आरक्षणाची मागणी सरकारपर्यंत पोहोचवली जाईल, असं मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्या ठाणे आणि नवी मुंबईतील दुकानं, आस्थापनं सुरू राहतील. मराठा आरक्षण प्रकरणी काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती पडताळून पाहण्यासाठी स्थापन करण्यात आलेला मागासवर्ग आयोग 15 नोव्हेंबरपर्यंत आपला अंतिम अहवाल उच्च न्यायालयात सादर करेल, अशी माहिती राज्य सरकारने आज हायकोर्टात दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काल मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारकडूव शपथपत्र सादर करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण देता येईल की नाही याबाबतचा अंतिम अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत देऊ, असं न्या. एम. जी. गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील मागासवर्ग आयोगाने सांगिल्याची माहिती राज्य सरकारनं न्यायालयात दिली. दरम्यान, अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आयोगाने मागितलेला तीन महिन्यांचा कालावधी जास्त आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने पुकारलेलं आंदोलन तीव्र होत असून, त्यात आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. न्यायालयाच्या दृष्टीनं ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे राज्य सरकारनं मागासवर्ग आयोगाला आपला अहवाल लवकरात लवकर सादर करण्यास सांगावा, अशी सूचना उच्च न्यायालयानं केली.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNavi Mumbaiनवी मुंबईthaneठाणे