आठवड्याभरात सुरु होणार महापालिकेची स्वत:ची पहिली कोविड १९ टेस्टिंग लॅब
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 17:29 IST2020-07-14T17:28:44+5:302020-07-14T17:29:19+5:30
चाचणीचा निकाल प्राप्त होण्यासाठीचा वेळ वाचणार, दररोज ३०००चाचण्यां करण्याची क्षमत

आठवड्याभरात सुरु होणार महापालिकेची स्वत:ची पहिली कोविड १९ टेस्टिंग लॅब
डोंबिवली: कल्याण, डोंबिवली, उल्हसनगर, भिवंडी महापालिका तसेच अंबरनाथ व बदलापूर न.प. क्षेत्रातील नागरिकांसाठी दररोज 3हजार कोरोना रुग्ण तपासणी करण्याची लॅब आठवडाभरात केडीएमसी हद्दीत कार्यान्वित होणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. कल्याण, डोंबिवली, उल्हसनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी शहरांमधील वाढते कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड-१९ च्या जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात तसेच या चाचण्यांच्या निकाल लवकरात लवकर मिळाल्यास संबंधित रुग्णाला वेळेत रुग्णालयात उपचार घेता येतील, याकरिता कल्याण डोंबिवली महापालिका क्षेश्रात कोरोना चाचण्यांसाठीची लॅब सुरु करण्यासाठी प्रयत्न केले होते, त्यानुसार आता लवकरच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्वत:ची पहिली कोविड १९ टेस्टिंग लॅब कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि खासगी लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने पीपीपी तत्वावर सुरु करण्यात येत आहे.
गौरीपाडा, कल्याणपश्चिम परिसातील त्रिमूर्ती_पार्क येथील महापालिकेच्या वास्तूमध्ये सदर लॅब उभारण्यात येत असून मंगळवारी या लॅबची पाहणी करत तेथील यंत्रणेचा शिंदे यांनी आढावा घेतला. याप्रसंगी महापौर विनिता राणे, माजी महापौर व स्थानिक नगरसेवक राजेंद्र देवळेकर, नगरसेवक विश्वनाथ राणे व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या लॅबमध्ये दररोज ३००० चाचण्यां करण्याची क्षमता असून यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री ही क्रशना डायग्नोस्टिक्सच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. नॅशनल एक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटोरीज या संस्थेची मान्यता मिळाल्यावर येत्या आठवड्याभरात ही लॅब कार्यान्वित होईल. शक्यतोवर होणारविनामूल्य टेस्ट ही टेस्ट महापालिका हद्दीतील रुग्णांसाठी विनामूल्य करण्यासाठी प्रयत्न, बोलणी सुरू असल्याचे शिंदे म्हणाले. त्यावर लॅब सुरू होण्या दरम्यान निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले. सध्या पीपीई तत्वानुसार ती चालवण्यावर बोलणी झाली असून महापालिका खर्चाचा भार उचलणार का यावर विचार विनिमय सुरू असून आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या समवेत चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले.