शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

तुरुंग अधिकाऱ्यांकडून साक्षी निमसेचा घातपात; मुलीचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:06 IST

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा; नवऱ्याचा खूनाचा होता आरोप

कल्याण : आधारवाडी कारागृहात पतीच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या साक्षी निमसे हिने आत्महत्या केली नसून, तिचा तुरुंगातील अधिकाºयांकडून घातपात झाल्याचा संशय तिच्या १८ वर्षांच्या मुलीने व्यक्त केला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करत दोषी अधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असा अर्ज तिने खडकपाडा पोलिसांना दिला आहे.शिवसेनेचे शहापूर उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे (रा. अघई) यांची एप्रिल २०१८ मध्ये हत्या झाली होती. संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी आसनगाव येथील प्रमोद लुटे आणि शैलेश यांची पत्नी साक्षी या दोघांना अटक केली. साक्षीला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने ११ महिन्यांपासून ती कल्याणच्या आधारवाडी कारागृहात होती. मात्र, रविवारी कारागृहातच तिने आत्महत्या केली. याबाबत साक्षीच्या मुलीने पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, आईच्या जामिनासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत होतो. जेव्हा आमची आईशी भेट होई तेव्हा ती जामिनाबाबत विचारात असे. मात्र, तिच्या बोलण्यातून ती कधी आत्महत्या करेल, असे जाणवले नाही.मुलीने पुढे म्हटले आहे की, ‘रविवारी दुपारी १ च्या सुमारास आईने आत्महत्या केल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने आम्हाला कळवली. आम्ही सर्व जण आधारवाडी कारागृहात पोहोचलो. मात्र, तेथील अधिकाºयांनी आईचा मृतदेह उल्हासनगर येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविल्याचे सांगितले. परंतु, नातेवाईक नसताना तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कसा पाठवला, अशी विचारणा आम्ही केली. त्यावर अधिकाºयाने सांगितले की, साक्षी जिवंत असल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले होते. कारागृहात आईने आत्महत्या केली ते ठिकाण नातेवाइकांनी दाखविण्यास सांगितले असता ती जागाही संबंधित अधिकाºयाने दाखवली नाही. तसेच, साक्षीने गळफास घेतला, असे कोणतीही महिला सांगू इच्छित नव्हती. ज्या दोन महिला आल्या होत्या त्याही पढवल्यासारख्या बोलत होत्या. हा सर्व प्रकारच संशयास्पद वाटत असल्याने माझ्या आईने आत्महत्या केलेली नाही.’मानवी हक्क आयोगाकडेही दादतुरुंगातील अधिकाºयांकडूनच साक्षीचा घातपात झाला असावा, असा दाट संशय आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून मला न्याय द्यावा, अशी मागणी करणाºया अर्जाची प्रत साक्षीच्या मुलीने राज्य मानवी हक्क आयोग, ठाणे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण आणि महिला तक्रार निवारण कक्षालाही दिली आहे.जामीन मिळत नसल्याने त्रास होत आहे. त्यामुळे मला जगावसे वाटत नाही, असे साक्षी तुरुंगातील महिला कैद्यांजवळ बोलली होती. कारागृहात असे काही घडत नाही. आमच्यावर करण्यात आलेला आरोप हा खोटा आहे.- भारत भोसले, तुरुंगाधिकारी, आधारवाडी कारागृह

टॅग्स :jailतुरुंगkalyanकल्याणMurderखून