शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

ठाणे येऊरच्या बंगल्यांसह जंगलात शिरणाऱ्या थर्टीफस्टच्या तळीरामांवर रात्रंदिवस खडा पहारा

By सुरेश लोखंडे | Published: December 30, 2019 9:16 PM

सुरेश लोखंडे ठाणे : जुन्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी संजय गांधी राष्र्टीया  उद्याच्या सीमेवरील येऊर व उपवन जंगलात ...

ठळक मुद्दे२०२० या नूतन वर्षाच्या संकल्पमध्ये बाधा येणार नाही यासाठी झिंगाटणाऱ्यांवर वन कायद्याखाली कडक कारवाईडीजेच्या ध्वनी प्रदुषणामुळे उद्यानातील पशूपक्षी, प्राणी सैरावैरा धावतात

सुरेश लोखंडेठाणे : जुन्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी संजय गांधी राष्र्टीया  उद्याच्या सीमेवरील येऊर व उपवन जंगलात थर्टी फस्टचे तळीराम कोणत्याही चोरीच्या रस्त्यांनी घुसतात. या स्वागत पाट्यांच्या डीजेच्या ध्वनी प्रदुषणामुळे उद्यानातील पशूपक्षी, प्राणी सैरावैरा धावतात, जंगलास वनवा लागण्याची दाट शक्यता असते. यास वेळीच आळा घालण्यासाठी यंदा वनविभागाने जंगलात शिरणाऱ्यांवर खडा पहारा ठेवला आहे. या बंदीस न जुमानता धांगडधिंगा करून झिंगाटणाऱ्यांवर वन कायद्याखाली कडक कारवाईचे संख्येत मिळाले आहेत.            येऊर गावातील हॉलीडे रिसॉर्ट, खाजगी बंगले, हॉटेल, निवासी घरे आदी ठिकाणी व येऊर उपवनातील जंगलातील महत्वाचे आठ पिकनिक स्पॉट्स हेरून चोरट्यावाटांनी तळीराम जंगलात जाण्याची शक्यता आहे. यावर लक्ष केंद्रीत करून येऊर परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांसह चेणा, घोडबंदर, नागलाबंदर आदी ठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी खडा पहारा लावला आहे. याप्रमाणेच येऊरच्या परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांनी २९ वनअधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक रात्रंदिवस तैनात ठेवले आहेत. यामुळे येऊर व उपवन, घोडबंदर, नागला बंदरकडे मोठ्याप्रमाणात ओढ असलेल्या ठाणे, मुंबई परिसरातील तरूणांच्या थर्टीफस्टच्या पार्टीवर वन अधिकाऱ्यांची करडी नजन लक्ष ठेवून आहे. वन अधिकाऱ्यांसह पोलिसांकडून सोमवारपासून चोख बंदोबस्त लावला आहे.       मानपाडा येथील निसर्ग परिचय केंद्र, ससुपाडा, एअर फोर्स, म्हातार खिंड, डिएसपी गेट आणि कोकणी पाडा आदी परिसरासरात स्थानिकांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील मद्यपी धिंगाणा घालतात. जबरदस्ती करून जंगलात प्रवेश करतात. एवढेच नव्हे तर जंगलाच्या चोरवाटांनी देखील जंगलात प्रवेश केला जातो. यावर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी येऊर, उपवनच्या जंगलात तैनात केलेले २९ अधिकारी, कर्मचारी आजपासूनच या परिसरातील वाहनांची तपासणी करीत आहेत. दारू आढळून आल्यास उत्पादन शुल्क विभागाकडे सोपण्याचे नियोजन आहे. प्रदूषण आढळून आल्यास त्याची नोंद घेऊन तत्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्याचे नियोजन वन विभागाकडून करण्यात आले आहेत. यासाठी खास बंदोबस्त लावले आहेत. येऊरच्या ठिकठिकाणच्या प्रवेशव्दारावर तपासणी सुरू आहे. बंगल्याचे कारण सांगितले जात असले तरी खात्री करून त्यांची नोंद घेतली जात आहे. आवश्यत ठिकाणी सीसीटीव्हीचा देखील वापर करण्यात येत आहे.          मधूबन गेट, एअर फोर्स, वणीचा पाडा, घाटोणपाडा, पाटणपाडा, रौनाचा पाडा, जांभूळपाडा, भेंडीपाडा, चेणा ब्रीज, चेणा नदी आदी ठिकाणांसह पिकनिक स्पॉट्सवर वनाधिकारी, पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहेत. मधुबन प्रवेशव्दारावर आठ वनपाल, वनरक्षक तर एअर फोर्सवर दोन वरनक्षक, म्हातारखिंडीही दोन, डिएसपी गेटवर तीन , मानपाडे येथील निसर्ग परिचय केंद्रांवर तीनख् ससुपाडा, आदीवासी निवासी पाडे, आदी ठिकाणी प्रत्येकी तीन आणि चेना ब्रीजवर दोन अधिकाऱ्यांना तैनात केले आहेत. या २९ वनाधिकारी, वनपालांच्या पथकांकडून संजय गांधी उद्यान, येऊर, उपवन या जंगलांमध्ये तळीराम शिरणार नाही, जंगलातील वन्यप्राण्यांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होणार नाही याची काळजी या अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे.      बंगलाच्या आवारात पार्टी करणाऱ्यांसाठी आधीच तंबी ध्वनीप्रदूषण होणार नाही; याची ग्वाही बंगल्याच्या मालकांकडून घेण्यात आली. यामुळे जंगल संपत्तीचे नुकसान होणार नाही, वणव्याचे संकट उद्भवणार नाही, मद्यपीचा भर रस्त्यात , जंगलात , पाणवठ्यावर तळीरामांचा धिंगाणा दिसणार नाही यासाठी हा कडक व चोख बंदोबस्त वनखात्याने लावला आहे. त्यांच्या सोबत पोलिसांचा खाक्या सुध्दा तळीरामांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. २०१९ या जुन्या वर्षास निरोप व २०२० या नूतन वर्षाच्या संकल्पमध्ये बाधा येणार नाही यासाठी खास खबरदारी घेतली जात आहे. पर्यवरण प्रदुषित होणार नाही याची दखल वनविभाग, वन्यजीव प्रेमी आदींकडून घेतली जात आहे.

टॅग्स :thaneठाणेforestजंगल