शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एनआयएने घेतली वाझेंच्या ठाण्यातील घराची झडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:19 IST

वाझेंच्या मर्सिडीज बेन्झमध्ये सापडलेली पाच लाखांपेक्षा अधिक रोकड, इतर सामग्रीबाबत त्यांनी योग्य उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर एनआयएचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या पथकाने बुधवारी दुपारी १.३०च्या सुमारास ठाण्यातील साकेत येथील बी-६ इमारतीमधील वाझेंच्या घरात झडती घेतली.

ठाणे : एनआयएने ठाण्यातील साकेत सोसायटीत राहणारे वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निवासस्थानाची बुधवारी झडती घेतली. त्यांच्या पत्नी मोहिनी वाझे यांच्याकडे चार ते पाच तास चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाझेंच्या मर्सिडीज बेन्झमध्ये सापडलेली पाच लाखांपेक्षा अधिक रोकड, इतर सामग्रीबाबत त्यांनी योग्य उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर एनआयएचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या पथकाने बुधवारी दुपारी १.३०च्या सुमारास ठाण्यातील साकेत येथील बी-६ इमारतीमधील वाझेंच्या घरात झडती घेतली. मनसुख हिरेन आणि वाझे यांचे कसे संबंध होते? मनसुख यांच्या हत्येपूर्वी ते साकेत सोसायटीत आले होते का? वाझेंबरोबर काही वाद झाला होता का? अशा अनेक बाजूंनी वाझेंच्या कुटुंबीयांकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याचे समजते. चार तासांची घरझडती,  कागदपत्रे पडताळणी, चौकशीनंतर तेथे राबोडी पोलिसांना बाेलावले. सोसायटीतील काही रहिवाशांकडेही चौकशी केली. बुधवारी रात्री आठच्या सुमारास एनआयएचे मुंबईतील एक पथक वाझेंना घेऊन त्यांच्या निवासस्थानी आले होते. अवघ्या अर्ध्या तासांच्या चौकशीनंतर ते वाझेंना घेऊन सोसायटीबाहेर पडले. वाझेंच्याच सीआययू युनिटने सोसायटीतील सीसीटीव्हीतील चित्रण पत्र देऊन ताब्यात घेतले होते. त्यावेळी अशा कोणत्या घडामोडी झाल्या, याचीच विचारणा यावेळी वाझेंकडे पथकाने केली.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPoliceपोलिसraidधाड