शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
3
लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी
4
जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...
5
इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'
6
प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?
7
९०% लोकांना माहीत नाही दही खाण्याची योग्य पद्धत; करतात 'या' चुका, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
8
"वायनाडमधून लढायला या, मोदीजींना कोण रोखतंय?"; काँग्रेसचं पंतप्रधानांना ओपन चॅलेंज
9
सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज
10
Team India सुपर-८ साठी सज्ज; रोहितने सांगितली रणनीती, म्हणाला, "शक्य तितक्या..."
11
Gautam Gambhir Interview: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरची मुलाखत; निवड जवळपास निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतिक्षा
12
"माझ्यासोबत असं का केलं"; वसईत एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या
13
₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
14
मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; लक्ष्मण हाके यांचा सनसनाटी आरोप
15
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून मराठा समाजाची फसवणूक, शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा आरोप
16
गायिका अलका याग्निक यांना झालाय दुर्मिळ आजार, पोस्ट करुन केला खुलासा
17
सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन?
18
Vat Purnima 2024: १९ जूनपासून होत आहे वटसावित्री व्रतारंभ; जाणून घेऊया मूळ परंपरा!
19
एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल; दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण
20
सकाळी उठल्यावर परत परत झोपावेसे वाटते? शिवानी दीदी सांगताहेत उपाय!

शासकीय रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 5:44 AM

भार्इंदरच्या पंडित जोशी रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आई-वडिलांनी रुग्णालयातील भोंगळ कारभार यास जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जोशी रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

मीरा रोड : भार्इंदरच्या पंडित जोशी रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आई-वडिलांनी रुग्णालयातील भोंगळ कारभार यास जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जोशी रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.भार्इंदर पुर्वेच्या इंद्रलोक फेस २ मध्ये राहणाराया मंगला विक्रम चाड यांना प्रसुती वेदना होऊ लागल्याने शनिवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णालयात सोनोग्राफी सुरु नसल्याने त्यांना फाटकाजवळील एका बिल्डरने सुरु केलेल्या सोनोग्राफी केंद्रात तपासणीसाठी पाठवण्यात आले. तेथे सोनोग्राफी करुन झाल्यानंतर त्या परत रुग्णालयात आल्या. ५ मे रोजीच्या पहाटे दीडच्या सुमारास मंगला बाळंत झाल्या. पण बाळ हालचाल करत नव्हते. डॉक्टरांनी प्रयत्न करुनदेखील हालचाल नसल्याने बाळास मृत घोषित करण्यात आले.चाड दाम्पत्यास दहा वर्षांनी पहिल्यांदाच बाळ झाले होते. पण ते मृत झाल्याने त्यांच्यावर शोककळा पसरली. दरम्यान, इतक्या मोठ्या रुग्णालयात सोनोग्राफी सुरु नसल्याने पत्नीस त्या अवस्थेतदेखील खाजगी केंद्रात सोनोग्राफीसाठी पाठवण्यात आले. परंतु तेथे जाण्यासाठी रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. सोनोग्राफीचा अहवाल व्यवस्थित होता. मग बाळ मृत कसे झाले, असे सांगत विक्रम यांनी प्रशासन बाळाच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.नवघर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून उपनिरीक्षक विजय टक्के हे तपास करत आहे. पालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांच्याशी महापालिकेच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी कॉल घेतला नाही. रूग्णालयात आवश्यक सुविधा नसल्याची बाब प्रशासनानाला सतत कळवली आहे. पण प्रशासनाकडूनच आवश्यक आयसीयू, एनआयसीयू आदी सुविधाच दिल्या जात नसल्याने डॉक्टरांनी तरी काय करायचे, असा सवाल एका डॉक्टरने केला. या आधीही जोशी रुग्णालयात काही रुग्णांचे मृत्यू झाले असून, याबाबत महापालिकेवर तसेच शासनावर सातत्याने आरोप होत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू