ठाणे जिल्ह्यात १५३९ रुग्णांची नव्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 06:10 AM2020-07-30T06:10:59+5:302020-07-30T06:11:20+5:30

४२ जणांचा मृत्यू : आरोग्य विभागाची माहिती

New increase of 1539 patients in Thane district | ठाणे जिल्ह्यात १५३९ रुग्णांची नव्याने वाढ

ठाणे जिल्ह्यात १५३९ रुग्णांची नव्याने वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या १५३९ नव्या रुग्णांची बुधवारी वाढ झाली. यामुळे एकूण रुग्णसंंख्या ८२ हजार ७८९ झाली असून ४२ जणांच्या मृत्यूने जिल्ह्यातील मृतांची संख्या आता दोन हजार २८४ झाली आहे.


ठाणे पालिका क्षेत्रात कोरोनाचे २८८ रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या १८ हजार ४३७ झाली आहे. बुधवारीही नऊ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा ६१७ झाला आहे. कल्याण-डोंबिवली पालिका परिसरात २७७ रुग्णांची वाढ झाली. तर, १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे रुग्णांची संख्या १९ हजार ३०९ तर मृतांची ३३६ झाली आहे.


नवी मुंबई पालिका क्षेत्रात ३७५ रुग्णांसह तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. मीरा-भार्इंदरमध्ये १४५ रुग्णांची तर, पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या सात हजार ९८३ झाली असून मृतांची संख्या २६६ इतकी झाली आहे.


भिवंडी पालिका क्षेत्रात १२४ बाधित आढळले. यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ५६७ झाली आहे. तर, मृतांची संख्या १९४ वर स्थिर आहे उल्हासनगर पालिका परिसरात पाच जणांचा मृत्यू झाला असून ८५ नवे रुग्ण आढळले आहे. मृतांची संख्या १२४ तर बाधितांचा आकडा सहा हजार ६७३ झाला आहे. अंबरनाथमध्ये ८० नवे रुग्ण सापडले असून दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बाधितांची संख्या तीन हजार ६८९, तर मृतांची संख्या १४६ आहे. बदलापूरमध्ये ४६ रुग्णांमुळे बाधितांची संख्या दोन हजार ४४७ झाली. तर, ठाणे ग्रामीण भागात २१९ नवे रुग्ण सापडले असून सहा जणांचा मृत्यू झाला. बाधितांची संख्या सहा हजार ५७ झाली आहे.

वसई-विरारमध्ये १७७ नवीन रुग्ण
वसई-विरार पालिका परिसरामध्ये बुधवारी १७७ रुग्ण आढळून आले. तर, नालासोपाऱ्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ६४५ वर पोहोचली आहे. १२९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. एकूण ३ हजार ७६४ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

नवी मुंबईत ३७५ रुग्ण वाढले
नवी मुंबई : शहरात बुधवारी ३७५ रूग्ण वाढले असून एकूण रूग्ण संख्या १४,६२७ झाली आहे. बुधवारी बेलापूरमध्ये सर्वाधिक ८८ रूग्ण वाढले. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४0७ झाली आहे.

Web Title: New increase of 1539 patients in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.