Neelimkumar Khaare Yana Paper made of coconut made salami, researcher attitude required for environment | नीलिमकुमार खैरे याना कागदाचा नागसर्प बनवून दिली सलामी, पर्यावरण जतनासाठी संशोधक वृत्ती आवश्यक
नीलिमकुमार खैरे याना कागदाचा नागसर्प बनवून दिली सलामी, पर्यावरण जतनासाठी संशोधक वृत्ती आवश्यक

ठळक मुद्देपर्यावरण जतनासाठी संशोधक वृत्ती आवश्यक : नीलिमकुमार खैरेनीलिमकुमार खैरे याना कागदाचा नागसर्प बनवून दिली सलामी पर्यावरण दक्षता मंडळाचा २० वा वर्धापन दिन

ठाणे : आज ठाण्यातील सहयोग मंदिर हॉल येथे पर्यावरण दक्षता मंडळाचा २० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. साधारणतः ४०० नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.  या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सर्पतज्ञ ,मराठी लेखक आणि पर्यावरण तज्ञ  नीलिमकुमार खैरे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्यांच्या स्वागतासाठी सर्व उपस्थितांनी कागदाचा नागसर्प बनवून त्यांना सलामी दिली. त्यांनी "पर्यावरणातील विविध प्रयोग" याविषयावर व्याख्यान केले. पुण्यामध्ये उभारलेल्या प्राण्यांच्या अनाथालयाचा उल्लेख करीत त्यांनी आपल्या व्याख्यानात पर्यावरण जतनासाठी संशोधक वृत्तीची आवश्यकता असल्याचे सांगितले तसेच विविध प्रयोगांतून आपण पर्यावरण कसे वाचवू शकतो हे सांगितले. 

        विविध चित्रफितींच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत साध्या भाषेत पर्यावरण जतनासाठी आपण टाकाऊ वस्तूंचा वापर करून कशा पद्धतीने वेगवेगळे प्रयोग आपल्या दैनंदिन वापरात करू शकतो हे सांगितले . यामध्ये त्यांनी प्लास्टिक बाटल्यांचा वापर करून बनवलेल्या होड्या रसयंत्र (juicer), वाटण यंत्र (Mixer) , टायर आणि डिश अँटेना पासून बनवलेला सोलार कुकर , नारळ किसण्याची खवणी तसेच घराच्या घरी कपडे धुण्याचे यंत्र आपण कसे बनवू शकतो हे देखील सांगितले. या सगळ्या वस्तू बनवण्यासाठी हार्डडिस्कची रॅम, टायर, गाड्यांचे वायपर, प्लास्टिक बॉटल, योगाच्या चटया आदी टाकाऊ वस्तूंचा वापर केला होता . प्लास्टिक हि माणसाच्या दैनंदिन जीवनातील एक अत्यावश्यक गोष्ट असली तरीही तिच्या अतिवापरामुळे निसर्गावर, तसेच सगळ्या सजीवांवर दुष्परिणाम होत आहे. आपण जर असाच प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाचा ह्रास करत राहिलो तर कदाचित २०२६ सालापर्यंत पृथ्वीवर प्लास्टिकचे साम्राज्य उभे राहील आणि त्यामुळे पृथ्वीचा विनाश अटळ आहे हे खैरे यांनी सांगितले त्यामुळे प्लास्टिकचा पर्यावरणाशी समतोल साधून योग्य वापर करावा आणि टाकाऊ प्लास्टिक च्या वस्तूंचा वापर करून विविध प्रयोगशील जीवन जगावे अशी सूचना त्यांनी श्रोत्यांना केली. अरुण म्हात्रे लिखित पर्यावरणगीताने या कार्यक्रमाची सुरवात झाली . पर्यावरणीय सुरेल वातावरणात सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन नीलिमकुमार खैरे यांच्या हस्ते "पायर" चे झाड लावून करण्यात आले. यावेळी डॉ. प्रसाद कर्णिक यांनी पायरच्या झाडाची माहिती उपस्थितांना करून दिली. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीमा जोशी यांनी केले असून प्रा. विद्याधर वालावलकर यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची तसेच कार्यशाळांची माहिती उपस्थितांना करून दिली यावेळी त्यांनी संस्थेचा २० वर्षांचा जीवनक्रम उलगडून दाखवला आणि संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला . त्यानंतर "आपलं पर्यावरण" या द्विभाषीक मासिकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जेष्ठ कवी अरुण म्हात्रे , डॉ. के. पी.बक्षी ( जलसंपत्ती नियामक प्राधिकरण विभाग संचालक) आवर्जून उपस्थित होते आपल्या मनोगतात बोलताना डॉ. के. पी. बक्षी यांनी पर्यावरण दक्षता मंडळाच्या कार्याचा गौरव केला तसेच नद्यांमध्ये साठवणूक करण्यात येणाऱ्या पाण्याविषयी किती प्रमाणात पाणी नद्यांमध्ये साठवले जाते आणि उरलेले पाणी पुढील राज्यांत पाठवले जाते असे म्हणाले तसेच दूषित पाण्यावर प्रक्रिया करून असे पाणी पुनर्वापरात कसे येते याविषयी माहिती दिली. यावेळी संस्थेच्या २० वर्षांच्या वाटचालीत ज्यांचे अमूल्य मार्गदर्शन तसेच योगदान लाभले त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला , यामध्ये डॉ. के. पी. बक्षी, डॉ. कुसुम गोखले, डॉ. प्रकाश भडकमकर, डॉ. नागेश टेकाळे, डॉ. रघुनंदन आठल्ये , प्रकाश देशपांडे,  रश्मी दांडेकर , विश्वास लागू,  मंजिरी चुणेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो व्हिजिल या संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा चित्रा म्हस्के यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.

      कार्यक्रमाच्या महत्वाच्या टप्प्यात डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख श्रोत्यांना करून दिली. त्यानंतर डॉ. विकास हाज़िरणीस यांनि आपले मनोगत व्यक्त केले, त्यावेळी बोलताना ते म्हणाले कि पर्यावरण जतनासाठी त्यांनी ग्रीन पार्टीची आणि पर्यावरणाचा विचार करणारे खासदार असण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. मानसी जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि उपस्थितांनी यावेळी पर्यावरणस्नेही जगण्याची सामूहिक शपथ घेती आणि या शपथेचे आवश्वसन म्हणून एका झाडाच्या चित्रावर आपल्या बोटांचे तसेच हातांचे ठसे केले , या शपथेतून एक सुंदर झाडाचे नैसर्गिक चित्र त्यामुळे तयार झाले. त्यानंतर सामुहीक पर्यावरणगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Web Title: Neelimkumar Khaare Yana Paper made of coconut made salami, researcher attitude required for environment
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.