शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे आज अंबरनाथमध्ये शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: February 7, 2016 02:29 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी व कार्यकर्ता मेळावा ७ फेब्रुवारीला अंबरनाथ येथे होणार आहे. हा तालुका पक्ष सोडून बाहेर गेलेले व आता सत्ताधारी बाकावर असलेले भाजपाचे खासदार-आमदार

- सुरेश लोखंडे,  ठाणेराष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी व कार्यकर्ता मेळावा ७ फेब्रुवारीला अंबरनाथ येथे होणार आहे. हा तालुका पक्ष सोडून बाहेर गेलेले व आता सत्ताधारी बाकावर असलेले भाजपाचे खासदार-आमदार आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. चिरडच्या काठवळेवाडी येथील या जिल्हास्तरीय मेळाव्यात शेतकऱ्यांच्या समस्या व कार्यकर्त्यांच्या मागण्या, त्यातून पक्ष बळकटीकरणाचा मंत्र राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना देणार आहे. पक्ष सोडून गेलेल्या काही लोकप्रतिनिधींना जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन दाखवू पाहत असल्याने त्यातून पक्ष बळकट होणार की फोडाफोडीला ऊत येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. माजी पालकमंत्री गणेश नाईक, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे अनुक्रमे या जिल्हा मेळाव्याचे अध्यक्ष व उद्घाटक आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व असल्याचे सातत्याने दाखवत असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सत्ता गेल्यापासून दिसेनासे असलेले सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार गोटीराम पवार आदी मंडळी या वेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकही यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाची पाठराखण करत असल्याचे चित्र आहे. आत्मपरीक्षण करणार- पक्षातून बाहेर पडलेले खासदार कपिल पाटील यांच्यासह शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मतदारसंघ व एकेकाळचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पण आता भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या बालेकिल्ल्यात हा मेळावा घेऊन राष्ट्रवादी आत्मपरीक्षण करीत आहे.- ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादीची सत्ता असली तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. तरी, त्यांनी या मेळाव्यात शेतकऱ्यांना निमंत्रित केले आहे.