शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बुलेट ट्रेनच्या पर्यावरणीय सुनावणीला राष्ट्रवादीचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 2:48 PM

बुलेट ट्रेनच्या विरोधातील वातावरण आता अधिकाधिक तापू लागले आहे.

ठाणे - बुलेट ट्रेनच्या विरोधातील वातावरण आता अधिकाधिक तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या दिवसापासून बुलेट ट्रेनला विरोध केला असून आंदोलनही तापवण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी जिल्हाप्रशासनाने आयोजित केलेल्या पर्यावरणीय सुनावणीच्या वेळी गडकरी रंगायतनबाहेर आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. बुलेट ट्रेनसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादीत केल्या जाणार आहेत. शेतकर्‍यांना विश्वासात न घेता जमिनींचे संपादन केले जात असल्याने राष्ट्रवादीने विरोध केला आहे. तसेच, बुलेट ट्रेनसाठी कोटयवधी रुपये खर्च करण्यापेक्षा लोकल ट्रेन सुरळीत कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. मंगळवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये बुलेट ट्रेनच्या संदर्भात पर्यावरणीय हरकती आणि सूचनांची जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे हे नगरसेवक सुहास देसाई,  कोपरी पांचपाखाडी विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील , ठाणे शहर विधानसभाकार्याध्यक्ष  विजय भामरे, ओ. बी. सी.सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर , हेमंत वाणी, निलेश कदम, दिलीप नाईक, समीर भोईर, सुरेश सिंग, संतोष सहस्त्रबुद्धे, शैलेश कदम, सुमित गुप्ता, महेंद्र पवार, संदीप पवार यांच्यासह गडकरी रंगयातन येथे गेले. मात्र, प्रशासनाने त्यांना सुनावणीमध्ये सहभागी होण्यास विरोध केल्यामुळे त्यांनी रंगयातनच्या बाहेरच जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आनंद परांजपे यांनी, सध्या देशातील रेल्वे वाहतूक मोडकळीस आली आहे. ठाणे- कल्याणसारखी स्थानके अस्वच्छ स्थानकांच्या यादीत वरच्या क्रमांकावर येत आहेत. सरकते जिने स्टेशनांच्या बाहेर येऊन पडले आहेत. मात्र, ते बसवण्याचे औदार्य दाखविले जात नाही. एकीकडे लोकल ट्रेनमधून पडून हजारो लोक मरत असताना ही बुलेट ट्रेन आमच्या छाताडावर चालवून ठराविक वर्गाचे भले करण्याचा डाव आखला आहे. आमच्या पालघर, दिव्यातल्या शेतकर्‍यांना भूमिहीन करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगितले.