शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

राष्ट्रवादीलाही मिळणार ठाणे परिवहन समितीचे सभापतीपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:03 IST

शिवसेनेत अस्वस्थता; एक वर्षासाठी लागणार लॉटरी

- अजित मांडके ठाणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर स्थानिक पातळीवरदेखील त्याचे पडसाद उमटल्याचे चित्र आहे. यानुसारच ठाणे महापालिकेत विरोधी बाकावर असलेल्या राष्ट्रवादीलाही आता परिवहन समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक वर्ष सभापतीपद मिळणार असल्याचे समोर आले आहे. स्थानिक पातळीवर याला विरोध असला तरी राज्य पातळीवरील समिकरणे टिकविण्यासाठी शिवसेनेला आता महाविकास आघाडीतील घटकांसोबत जुळवून घ्यावे लागत आहे.ठाणे परिवहन समितीच्या सदस्यांची निवडणूक येत्या ४ मार्च रोजी होणार आहे. यावेळी विशेष महासभा घेऊन या सदस्यांची निवड केली जाणार आहे. परिवहन समितीत पक्षीय बलानुसार शिवसेनेचे सात सदस्य जाणे अपेक्षित आहे, तर राष्टÑवादीचे तीन आणि भाजपचे २ सदस्य जाणे अपेक्षित आहे. मात्र, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्टÑवादीने एक आणि काँग्रेसनेदेखील आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे. दुसरीकडे सोमवारी झालेल्या शिवसेना आणि राष्टÑवादीच्या बैठकीत महाविकास आघाडीमुळे एक मित्र पक्षांना देण्याचे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे झाल्यास मनात नसतांनादेखील शिवसेनेला राष्टÑवादीसाठी परिवहन समितीचे सभापतीपद सोडावे लागणार आहे. आधीच काँग्रेसला परिवहनमध्ये सामावून घेण्यासाठी शिवसेनेला आपला एक उमेदवार मागे घ्यावा लागणार आहे. त्यात आता एक वर्षासाठी परिवहनच्या सभापतीपदावरही एक वर्षासाठी पाणी सोडावे लागणार आहे.शिवसेनेची होतेय पीछेहाटशिवसेनेत यामुळे अस्वस्थता पसरली असून महाविकास आघाडीमुळे राज्यात जरी फायदा झाला असला तरी स्थानिक पातळीवर मात्र शिवसेनेची आता या निमित्ताने टप्प्याटप्प्याने पीछेहाट होणार असल्याचे चित्र या निमित्ताने दिसू लागले आहे.

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना