शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे कार्यकारणीची भरगच्च यादी जाहीर

By अजित मांडके | Updated: October 21, 2023 16:23 IST

माजी नगरसेवकांना विशेष निमंत्रितांमध्ये स्थान

ठाणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे शहर नवीन कार्यकारणी जाहीर झाली आहे. यात २५ उपाध्यक्ष, १० सरचिटणीस, १० चिटणीस, ३२ सचिव, चारही विधानसभा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला कार्याध्यक्ष, आदींसह विविध सेलच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय माजी नगरसेवकांना विशेष निमंत्रीतांच्या यादीत समावेश करण्यात आला असून भरगच्च यादी जाहीर झाली आहे. परंतु मुंब्य्रातील काही माजी नगरसेवकांनी वेगळी चुल मांडल्याने त्यांना यात स्थान देण्यात आले नाही.

राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत. त्याचे पडसाद ठाण्यातही उमटल्याचे दिसून आले. त्यात ठाणे शहर अध्यक्ष असलेले आनंद परांजपे यांनी देखील अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या जागी सुहास देसाई यांची शहर अध्यक्ष पदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर शनिवारी शरद पवार गटाची ठाण्याची भरगच्च अशी कार्यकारणी जाहीर झाली आहे. त्यात अनेक नव्या जुन्या चेहऱ्यांना  संधी देत नाराजी देखील दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

ज्यांना संधी मिळत नाही, ते इतर पक्षात उडी मारतात असे इतर पक्षात चित्र दिसत आहे. त्यामुळे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी जवळ जवळ सर्वांनाच संधी देत ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे यादीकडे पाहिल्यास दिसून येत आहे. त्यामुळेच उपाध्यक्ष पदी थेट २५ जणांना संधी देण्यात आली आहे. इतकेच नाही तर ही संधी देतांना ज्यांना आतापर्यंत डावलण्यात आले होते, त्यांना देखील संधी देत आपलेसे करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. प्रभाकर सावंत, माजी नगरसेवक हिरा पाटील, एकनाथ जाधव यांच्यासह यात २५ जणांचा समावेश आहे.

दुसरीकडे सरचिटणीस (प्रशासन) पदी देखील १०, चिटणीस १० आणि तब्बल ३२ सचिव पदे देण्यात आली आहेत. तर तिजोरीच्या चाव्या अर्थात खजनिदारपदी माजी नगरसेवक अमित सरय्या यांची निवड झाली आहे. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चारही विधानसभेच्या ठिकाणी अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ब्लॉक अध्यक्ष, कार्याध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

महिलांची फळी मजबुत करण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे. युवक अध्यक्षपदी विक्रम खामकर, मयुर शिंदे याची युवक कार्याध्यक्ष, पल्लवी जगताप युवती अध्यक्ष आदींसह सामजिक न्याय, ओबीसी सेल, अल्पसंख्याक सेल, व्यापारी, असंघटीत कामगार, लीगल , वैद्यकीय, हॉर्कस, जेष्ठ नागरीक, सोशल मिडिया आदी पदावर देखील नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

माजी नगरसेवकांना विशेष निमंत्रितांमध्ये संधीराष्ट्रवादीच्या जे शिल्लक आहेत, त्यातील बहुतुकांना विशेष निमंत्रीतांमध्ये संधी देण्यात आली आहे. यात मनोहर साळवी, मिलिंद पाटील, महेश साळवी, शाणु पठाण, माजी युवक अध्यक्ष मंदार केणी यांच्यासह ३८ जणांना विशेष निमंत्रीतांमध्ये स्थान देण्यात आले आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडAjit Pawarअजित पवार