राष्ट्रवादीने राज्यपालांना पाठविली संविधानाची प्रत; संविधानिकपदाची करून देणार जाणीव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 07:58 AM2020-10-15T07:58:20+5:302020-10-15T07:58:54+5:30

आनंद परांजपेंची माहिती

NCP sends copy of constitution to governor; Awareness of constitutional position | राष्ट्रवादीने राज्यपालांना पाठविली संविधानाची प्रत; संविधानिकपदाची करून देणार जाणीव

राष्ट्रवादीने राज्यपालांना पाठविली संविधानाची प्रत; संविधानिकपदाची करून देणार जाणीव

Next

ठाणे :  संविधानिकपदावर विराजमान असतानाही संविधानाने सांगितलेल्या ‘धर्मनिरपेक्ष’ तत्त्वांचा विसर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पडला आहे, असा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना बुधवारी संविधान तसेच प्रास्ताविकेची लॅमिनेट प्रत स्पीड पोस्टाने पाठविली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ‘हिंदुत्ववादी’ असूनही गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील देवदेवतांना बंदीत ठेवले आहे. प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की, तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष बनला आहात? असा सवाल राज्यपालांनी केला होता. त्यांच्या या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी ठाणे शहराच्या मुख्य टपाल कार्यालयात एकत्र येऊन ‘संविधानाचा विजय असो’, अशा घोषणा देऊन राज्यपालांना संविधानाची प्रत स्पीड पोस्टद्वारे पाठविली. 
यावेळी आनंद परांजपे यांनी सांगितले की, महामहिम राज्यपालांना आम्ही भारतीय संविधान सविनय सादर करीत आहोत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. कदाचित, त्यांना या संविधानाचा विसर पडला असेल की काय, म्हणूनच भारतीय  प्रास्ताविका त्यांना पाठवत आहोत.

यावेळी राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा सुजाता घाग, विक्रम खामकर, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, विधानसभा कार्याध्यक्ष विक्रांत घाग, सामाजिक न्याय विभागाध्यक्ष कैलास हावळे, सरचिटणीस रवींद्र पालव आदी उपस्थित होते. 

Web Title: NCP sends copy of constitution to governor; Awareness of constitutional position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.