शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

काही मंडळींकडून महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचा होतोय प्रयत्न : जितेंद्र आव्हाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 09:58 IST

पालिका, जि.प. निवडणुकीत सेनेसोबत आघाडीची तयारी.

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे ९९ टक्के आघाडी करून लढतील, असा विश्वास व्यक्त करतानाच दोन्ही पक्षांतील काही विघ्नसंतोषी मंडळी महाविकास आघाडीच्या दुधात मिठाचा खडा टाकत असल्याचा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. आव्हाड यांनी नवी मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेवर टीका करताना स्थानिक नेतृत्वावर टीका केली होती. त्यामुळे आव्हाड यांनी नामोल्लेख केला नसल्याने त्यांचा रोख कुणाकडे याबाबत तर्कवितर्क सुरू झाले.राष्ट्रवादी काँग्रेसचा वैचारिक शत्रू भाजप असल्याने त्या पक्षाला पराभूत करण्यासाठी आपल्याला दोन पावले मागे यावे लागले तरी चालेल. परंतु आघाडी करावीच लागेल, असे सांगून आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना तडजोडीला तयार राहण्यास सांगितले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी ठाण्यात ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ या कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आव्हाड बोलत होते. आव्हाड म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी आता फक्त ९० दिवस शिल्लक आहेत. आळस झटकून प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे. भाजपने नोटबंदी, जीएसटी लागू करून लोकांचे आर्थिक नुकसान केले. इतरही चुकीच्या गोष्टी केल्या. त्याची माहिती प्रत्येक मतदाराला देण्याचे काम कार्यकर्त्याने करावे. राज्यात महाविकास आघाडीचे काम योग्य पद्धतीने सुरू असून, शरद पवार यांच्यानंतर राज्यासाठी काम करणारा नेता कुणी असेल तर तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. येत्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आघाडी होईल, असा विश्वास व्यक्त करून आव्हाड म्हणाले, कदाचित एकनाथ शिंदे यांनाही तसेच वाटत असेल. आमच्यात काही गोष्टींवरून जरी वाद होत असले तरी ते तात्पुरते असल्याने आघाडी निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ओबीसी आरक्षण कोण रोखतंय.. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही लढा सुरू ठेवला असून, तो सुरूच राहणार आहे. राज्यात आरक्षणाची अंमलबजावणी शरद पवार यांनी केली. ओबीसी आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात कोण जात आहेत हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्ष भाजपवर निशाणा साधला.

केवळ सोशल मीडियाने निवडणूक जिंकता येत नाहीराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आव्हाड यांनी कान टोचले. केवळ सोशल मीडियावर सक्रिय राहून निवडणुका जिंकता येत नाहीत. मतदार नोंदणी, घराघरांत जाऊन संपर्क यावर भर द्यावाच लागेल. आपण नगरसेवक नाही, म्हणून वॉर्डातील कामे करण्याचे टाळू नका. निवडणुकीत पडलो म्हणून पुढील पाच वर्षे वॉर्डात कामच करायचे नाही, असे चालणार नाही, असे ते म्हणाले.

राऊतांनी घडवले माणुसकीचे दर्शन शरद पवार यांना बसण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी स्वत: खुर्ची उचलून दिल्यावरून भाजपची मंडळी टीका करीत आहेत. परंतु वडीलधाऱ्या माणसाला मदत करून राऊत यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. मात्र भाजपमध्ये लालकृष्ण अडवाणी यांना उभे राहण्यासाठीदेखील जागा दिली जात नाही, ही त्यांची संस्कृती असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडElectionनिवडणूकthaneठाणे