शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

Coronavirus: आरोग्यमंत्र्यांकडून घरात राहण्याचं आवाहन; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 15:58 IST

Coronavirus: राज्यात कोरोनाचं सावट असताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात

उल्हासनगर: देशात कोरोनामुळे सर्वत्र दहशत पाहायला मिळत असताना, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असताना उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीनं पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना परिस्थितीचं गांभीर्य नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे दररोज पत्रकार परिषद घेऊन गर्दी टाळा, विनाकारण घराबाहेर पडू नका, असं कळकळीचं आवाहन करत असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षप्रवेशात गुंग असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. उल्हासनगरमध्ये कोरोनाचे सावट असताना राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेता कार्यालयात शनिवारी दुपारी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. भाजपचे पदाधिकारी अमित वाधवा यांनी सहकाऱ्यांसमवेत शहराध्यक्ष हरकिरण कोर धामी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्याकडे राष्ट्रवादीनं शहर सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे.उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या खास मर्जीतील व शहर सचिवपदी असणारे अमित वाधवा यांनी शनिवारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे गटनेता भरत गंगोत्री यांच्या भाटिया चौकातील पक्ष कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम शनिवारी दुपारी 1 वाजता पार पडला. यावेळी शहराध्यक्ष हरकिरण कौर धामी, पक्षाचे निवडक पदाधिकारी उपस्थित होते. शहराध्यक्ष कौर धामी यांनी वाधवा यांचे स्वागत करून त्यांची शहर महासचिव पदी नियुक्त केल्याची माहिती दिली. वाधवांमुळे पक्षाची ताकद वाढल्याची माहिती कौर व गंगोत्री यांनी दिली असून राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर पक्षाचे काम एकनिष्ठतेने करणार असल्याचे वाधवा म्हणाले.शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलीस व महापालिका प्रशासन नागरिकांत जनजागृती करून प्रसंगी कारवाई करत आहेत. अशावेळी  राष्ट्रवादी पक्षाने पक्षप्रवेश कार्यक्रम घेतल्यानं शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यात हिललाईन पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कार्यक्रम ठिकाणी भेट दिल्याचे बोलले जात आहे. तर  शहराध्यक्ष हरकिरण धामी व गटनेता भरत गंगोत्री यांनी निवडक 3 ते 4 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश दिल्याची प्रतिक्रिया दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव टळल्यानंतर पक्ष प्रवेशाचा जल्लोष करण्यात येणार असल्याचे गंगोत्री म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNCPराष्ट्रवादी काँग्रेस