शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

“भाजपला संपवून टाकण्यासंदर्भातील भाषण उत्तर प्रदेशात व्हायरल करा”; जितेंद्र आव्हाडांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 17:42 IST

उत्तर प्रदेशात जाऊन भाजपविरोधात प्रचार करणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

ठाणे: देशात आताच्या घडीला पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीवर (UP Election 2022) भाष्य केले आहे. भाजपला संपवून टाकण्यासंदर्भातील भाषण उत्तर प्रदेशात व्हायरल करा, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 

मुंब्रामध्ये विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. माझ्यावर बुलंदशहर मधील उमेदवाराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मी उत्तर प्रदेशात जाऊन भाजपविरोधात प्रचार करणार आहे. पण काही जण भाजपची सुपारी घेऊन उत्तर प्रदेशात उभे आहेत. मतदारांमध्ये फूट पाडण्यासाठी खेळी सुरू आहे. त्यापासून सावध राहा. स्वतःची अक्कल लावा. मत कोणाला दिले पाहिजे, हे तुम्ही ठरवा, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. 

... तर ते जिंकतील

भावनेच्या आधारे राजकारण होत नाही. तुमच्यात फूट पडणार. पण जिंकणार कोण? तर ते जिंकतील. पण नुकसान कोणाचे होणार? आपले होणार आणि देशाचे होणार? या निवडणुकीवर देशातील पुढील रणनीती अवलंबून राहणार आहे, असे सांगत भाजपला हरवायला पाहिजे, हे महत्वाचे आहे. भाजपला हरवा, हे तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये जाऊन लोकांना सांगा. मी स्वतः उत्तर प्रदेश मध्ये जाऊन भाजपविरोधात प्रचार करणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक साधीसुधी नाही. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. त्यामुळे ही निवडणूक गांभीर्याने घ्या. कोणीही गाफील राहू नका. तुम्ही आज जे ठरवणार, तेच तुमचे भविष्य असणार आहे. तुमचे भविष्यच जर बिघडणार असेल, तर भाजपला  संपवून टाका, असे आवाहन करतानाचे माझे हे भाषण उत्तर प्रदेशात व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल करा, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.  

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा