शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मो.पैगंबरांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या नुपूर शर्माच्या अटकेसाठी राष्ट्रवादी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 15:47 IST

NCP aggressive for arrest of BJP's Nupur Sharma : पैगंबरांचा अवमान करणाऱ्या नुपूर शर्माच्या अटकेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, मुंब्रा येथे जोरदार निदर्शने आणि रास्ता रोको

ठाणे :  भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा  यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यानिषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नुपूर शर्मा यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी गृहनिर्माण मंत्री ना.डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा-मुंब्रा युवक अध्यक्ष तथा मा. विरोधीपक्ष नेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करून दारूल फलाह मशिदीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पठाण यांनी, महामानव आणि प्रेषीतांचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करणेसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष कायदा करावा; नुपूर शर्मा यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली.

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा यांच्या विरोधात मुंबई, भिवंडी तसेच मुंब्रा येथे एफआयर दाखल करण्यात आला आहे. नूपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य टीव्ही वाहिनीवरील चर्चेत केलं होतं.   नूपूर शर्मा यांच्या विरोधात कलम भादंविच्या २९५ अ, १५३अ आणि ५०५ ब अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र, त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांना अटक करावी, या मागणीसाठी मंगळवारी शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली शाकीर शेख, मैसर शेख, साकिब दाते, मर्जिया पठाण, नाजीम बुबेरे यांच्या उपस्थितीत जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंब्रा ,कौसा भागातील शेकडो नागरिक मोर्चाने आंदोलनस्थळी दाखल झाले. या आंदोलकांनी दारूल फलाह मशिदीसमोरच रस्त्यावर ठाण मांडून रास्ता रोको करीत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.  नुपूर शर्मा यांना अटक झालीच पाहिजे, मानवतेचे शत्रू कोण; भाजपशिवाय दुसरे कोण, नुपूर शर्मा मुर्दाबाद अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. तसेच शर्मा यांच्या प्रतिमेला जोड्यांचा मारही देण्यात आला.  रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान, यावेळी शानू पठाण यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. "आज सामान्य भारतीयांना पोट भरण्याची चिंता आहे. महागाई गगनाला भिडली आहे. अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे.

भारताची वाटचाल श्रीलंकेच्या दिशेने सुरू आहे. या सर्वांवरून लक्ष हटविण्यासाठी धर्माचे कार्ड वापरले जात आहे. मंदिर, मस्जिद असे वाद निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, भारतीय जनता सुजाण आहे. या समाजविरोधी भाजप धोरणांना जनता 2024 मध्ये चोख उत्तर देणार आहे. नुपूर शर्मा यांनी जे विधान केले आहे ते विधान जाणीवपूर्वक आणि भाजपच्या नीतीधोरणानुसारच केले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.  नुपूर शर्मा यांच्यावर केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही. त्यांना तत्काळ अटक करण्यात आली पाहिजे. तसेच, कोणत्याही धर्माच्या प्रेषित आणि महामानवांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यासाठी नवीन कायदा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी मा. विरोधी नेते  शानू पठाण यांनी केली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणेPoliceपोलिसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड