शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रौत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती

By अजित मांडके | Updated: October 13, 2023 13:52 IST

ठाण्यातील टेंभीनाका येथील नवरात्रोत्सव जगातील अनेक देशात प्रसिध्द आहे.

ठाणे : जागतिक पातळीवर प्रसिध्द असलेल्या ठाण्यातील श्री भवानी चौकातील नवरात्रौत्सवात जन्मभूमी श्रीराम मंदिर (अयोध्या) लोकार्पण महापर्वाची पूर्वसंध्या म्हणून दुर्गदुर्गेश्वरीचा दरबार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली प्रती श्रीराम मंदिर स्वरुपात भाविकांना अनुभवयास मिळणार आहे अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठाण्यातील टेंभीनाका येथील नवरात्रोत्सव जगातील अनेक देशात प्रसिध्द आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सुरु केलेल्या या नवरात्रौत्सवाचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढतच आहे. दिघेसाहेबानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा आजतागायत त्याच उत्साहात सुरू ठेवली आहे. टेंभीनाका येथील दुर्गेश्वरीच्या दर्शनासाठी तसेच येथील देखावा पाहण्यासाठी अनेक राज्यातील देवीभक्त दरवर्षी येत असतात. भव्य दिव्य आरास हे या उत्सवाचे खास वैशिष्ट्य. यावर्षी श्रीराम मंदिर लोर्कापण सोहळयाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. नागर शैलीवर आधारीत हे मंदिर पूर्णपणे फायबर ग्लास, स्टील, लाकडी फळया, ऑईल पेंट आदि सामुग्रीचा प्रामुख्याने यामध्ये वापर करण्यात येणार आहे.

या मंदिराची आरास सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक अमन विधाटे साकारत असून मंदिर उभारण्यासाठी पुणे, कराड, शहापूर, भांडूप, जोगेश्वरी आणि टेंभीनाका ठाणे अशा सहा ठिकाणी काम सुरु असून, अंदाजे ३५० कुशल तर अनेक अकुशल कामगार अहोरात्र काम करत आहेत. प्रामुख्याने यामधील काम हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार व कलकत्ता येथील आहेत. मंदिराचा मुख्य गाभारा ४० x ४० फुट इतक्या मोजमापाचा असून, त्याची उंची फुट आहे. छताचा आतील भाग नक्षीकामाने नटलेल्या छत्री आकाराचा आहे. यामध्ये दशावतार सोबतच विद्रुमाऊली व श्री सत्यनारायणाचे भाविकांना दर्शन होणार आहे. सभा मंडप नागर शैलीच्या अप्रतिम शिल्प कलेची ओळख पटवून देणारी असेल असेही खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

यामध्ये संपूर्ण कारविंग असलेले ४० x ६० फुटाचे छत असून, एकूण ३२ छोटे-मोठे कोरीव खाय या मंदिराचा डोलारा उलघून धरणार आहेत. तर ६४ कोरीव कमानी एकंदरीत गाभाऱ्याची व सभामंडपाची आकर्षक मुर्त्यासह मंडपाची शोभा वाढविणार आहेत. माँ दुर्गेचे मखर पूर्णपणे कित असून, त्याची उंची १८ फुट तर १४ फुट लाबी व १० फुट रुंद आहे. मंदिराची शोमा वाढविण्यासाठी नक्षीकाम असलेल्या कार्पेट सोबतच झुंबर व आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. बाहेरील बाजूस ६ फुटी उंचीचे दोन गरुड स्वागतासाठी उभे असतील तर सात छोटे-मोठे कळस एक मुख्य कळस उभारण्यात येणार असून भगव्या ध्वजासह मंदिराची भव्यता कायम करत १० फुटाची उंची गाठण्याचा प्रयत्न करतील. बाहेरील रोडवरील मुख्य कमानी वानरसेनेचे दर्शन घडविणारे असल्यामुळे आपण श्रीरामांच्य नगरीत असल्याची निश्चितच अनुभूती भाविकांनी निश्चितच होईल असेही खासदार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरु केलेली नवरात्रौत्सवाची परंपरा अव्याहत चालू राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक अगदी हिरहिरीने काम करीत आहेत. दरवर्षी या उत्सवाची शोभा अधिकाधिक वाढत असून, निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचे तसेच ठाणेकरांची साथ आम्हाला मिळत आहे. सर्वांनी या नवरात्रौत्सवात सहभागी होवून या उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

सदर पत्रकार परिषदेस जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष उत्तम सोलंकी, भालचंद्र घुले, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, कमलेश चव्हाण, अनिल सोनावणे, संतोष घुले, संजय रवळेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेNavratriनवरात्रीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर