पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर देशभरात कारवाई; भिवंडीतून एका युवकास घेतले ताब्यात
By नितीन पंडित | Updated: September 22, 2022 17:16 IST2022-09-22T17:15:51+5:302022-09-22T17:16:01+5:30
भिवंडी शहरातील बंगालपुरा येथे ठाणे येथील दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करीत मोईनुद्दीन मोमीन या युवकास ताब्यात घेतले आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर देशभरात कारवाई; भिवंडीतून एका युवकास घेतले ताब्यात
भिवंडी- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेकडून दहशतवादी कृत्यांसाठी निधी दिला जात असल्याचा आरोप असून त्यातून एनआयएने देशभरात धाडसत्र सुरू केले आहे. गुरुवारी भिवंडी शहरातील बंगालपुरा येथे ठाणे येथील दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करीत मोईनुद्दीन मोमीन या युवकास ताब्यात घेतले आहे.
भिवंडी शहरातील बंगालपुरा या परिसरात राहणार मोईनुद्दीन मोमीन हा घरा शेजारील इमारतीमधील दुकानात चॉकलेट बिस्कीट याचा घाऊक व्यवसाय करतो आणि तेथूनच तो पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेसाठी काम करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे .